मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट २०४७ मध्ये सर्वसमावेशकता असावी

  55

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचना


वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर उपाययोजनांचा प्रामुख्याने समावेश असावा


मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हीजन डॉक्युमेंट २०४७ तयार करत असताना वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश असावा. तसेच या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये मत्स्यव्यवसायाशी संबधित भविष्याचा वेध घेणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान व ‘एआय’चा वापर यांचाही समावेश करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


मंत्रालयात व्हीजन डॉक्युमेंट २०४७ विषयी बैठक झाली. यावेळी मत्स्यव्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी उपस्थित होते. यंदा पावसाळा २० दिवस लवकर सुरू झाल्याचे सांगून मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, यामुळे आता आणखी २० दिवस मच्छिमार व्यवसाय बंद राहील. वातावरण बदलाचा सर्वांधिक परिणाम मत्स्यव्यवसायावर होतो. २०४७ पर्यंत या वातावरण बदलामुळे होणारे परिणाम आणि या परिणामांना सामोरे जाताना करावयाच्या उपाययोजना यांचा या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये समावेश करताना या उपाययोजना लोकाभिमूख असतील असे पहावे. व्हीजन डॉक्युमेंट हे वास्तवदर्शी आणि प्रयोगशील असावे. त्यासाठी जपान, इंडोनेशिया, नॉर्वे, स्विडन, इस्त्राईल या देशांसह केरळ,आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना भेट द्यावी. त्यांच्याकडे राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा अभ्यास करून त्यांचा राज्यात कशा प्रकारे समावेश करता येईल हे पहावे. किनारपट्टीची सुरक्षा यांचाही समावेश या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये करावा. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मच्छिमारी बंदर आणि मच्छि बाजारांत आधुनिक तंत्रज्ञानाचा, सोलरचा वापर यांचाही समावेश या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.



मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकाऱ्यांशी चर्चा


मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदरे विभागामार्फत राज्यात अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी उपलब्ध होण्याबाबत मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आशियाई बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.


यावेळी आशियाई बँकेचे राष्ट्रीय संचालक मिओ ओका, राष्ट्रीय उपसंचालक आरती मेहरा, नगर विकास तज्ञ संजय जोशी, प्रकल्प अधिकारी भावेश कुमार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर 'उदय' चे सल्लागार प्रितेश बाफना उपस्थित होते. यावेळी मुंबईतील तारापोला मत्स्यालय, मुंबईतील वॉटर मेट्रो, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड चे नवीन बंदर उभारणी, विद्यमान बंदराची देखभाल दुरुस्ती आणि देखरेखीसाठीच्या निधीविषयी चर्चा करण्यात आली. सकारात्मक झालेल्या या चर्चेमध्ये आशियाई विकास बँक अधिकारी यांनी लोकहिताच्या व विकासाच्या या प्रकल्पांमध्ये निधी देण्याविषयी सकारात्मकता दर्शवली. तसेच सॉव्हरींग आणि नॉन सॉव्हरींग निधी विषयीची सविस्तर माहिती दिली.


प्राथमिक स्वरूपात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पांचा व निधीचा अभ्यास करून तो पुन्हा आशियाई विकास बँकेस सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेमुळे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्या अनेक प्रकल्पांना निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच मंत्री राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आर्थिक बळ मिळणार आहे

Comments
Add Comment

ओला उबेरला आव्हान देणार भारत टॅक्सी

मुंबई : ओला, उबेर या खासगी अ‍ॅप आधारित सेवांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी देशात सहकारी तत्वावर ‘भारत टॅक्सी ’

पश्चिम रेल्वेवर उद्या दिवसा ब्लॉक नाही

सांताक्रूझ, माहीम दरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक मुंबई : शनिवार मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग

अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीला मुदतवाढ

मुंबई : अकरावी अर्थात FYJC प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांची प्रक्रिया झाली आहे. आता अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीची

गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाला परवानगी; तारखेचा घोळ?

मुंबई : यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी

‘माधुरी’वर उपचारासाठी महाराष्ट्रात योग्य जागेचा प्रश्न

मुंबई: नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘माधुरी’(महादेवी) हत्तिणीच्या घरवापसीबाबत मुंबईत बैठका सुरू असताना पेटाने लेटर

गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून सुटणाऱ्या जादा एसटी बससाठीही वेगानं होतंय आरक्षण

मुंबई : यंदा २७ ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून कोकणात