
स्ट्रीट लाईटसह दगडी पदपथासह होणार विकास
मुंबई :दक्षिण मुंबईत आल्यानंतर पूर्वीची मुंबई अनुभवता यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने नरिमन पॉईंट, फोर्ट, मरीन ड्राईव्ह, चर्नी रोड, ग्रँट रोड, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल परिसर, काळा घोडा व अन्य आजूबाजूच्या परिसराला हेरिटेज लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने कामे सुरू झाली असून येथील इमारतींना साजेसे असे पदपथ बांधले जात असून स्ट्रीट लाईट उभारल्या जात आहेत.
दक्षिण मुंबईतील मुंबई महापालिका मुख्यालयासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) व परिसरातील इमारती ब्रिटिशकालीन आहेत. अनेक इमारती १०० ते १५० वर्षे जुन्या असून आजही त्या दिमाखात उभ्या आहेत. पण गेल्या ५० वर्षांत दक्षिण मुंबई व आजूबाजूच्या परिसराचा विकास करताना, पदपथाचे जुने दगड काढून टाकण्यात आले. रस्त्यावरील स्ट्रीट लाईटही बदलण्यात आल्या. रस्ते, दुभाजक यांनीही पूर्वीचे वैभव हरवून बसले. यात मलाड दगडाचा वापर करून पुन्हा पदपथ बांधण्यासह पदपथावर दगडी लाह्या, वाहतूक बेटांचा विकास, हेरिटेज स्ट्रीट लाईट, इमारतींना साजेसे असे रंगकाम व अन्य कामे करण्यात येणार आहे. वर्षभरापूर्वी सीएसएमटी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून चर्चगेट ते चेन्नई रोड जाणाऱ्या महर्षी कर्वे रोडलगत पदपथ व हेरिटेज लूक देणाऱ्या स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या.

विक्रोळी, भांडुप, पवईतील नागरिकांसाठी इशारा मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एस विभागातील विक्रोळी, भांडुप आणि पवई येथील उंच उतार आणि सैल माती ...
दक्षिण मुंबईतील फॅशनेबल कपड्यांचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॅशन स्ट्रीटला हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. यात हेरिटेज स्ट्रीट लाईटसह दगडी पदपथ, एकसमान स्टॉल व आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असून दिवाळीपूर्वी या कामाचा शुभारंभ होईल, असे सांगण्यात येत आहे.