
मुंबई(ज्ञानेश सावंत): आज पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे होणार आहे. दोन्ही संघाची तुलना केली, तर दोन्ही संघ एकमेकांसमोर तगडे आहेत. मुंबईकडे रोहित शर्मा, रायन रिकल्टन, सूर्यकुमार, तिलक वर्मा असे महान फलंदाज व जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे अनुभवी गोलंदाज आहेत तरीही असे वाटते की विजय हा मुंबईपासून आज दूरच आहे.
आज खरी कसोटी लागणार आहे ती म्हणजे कर्णधार पदाची. तसेच कोण श्रेष्ठ कर्णधार हार्दिक पंड्या की श्रेयस अय्यर? याचे उत्तर नक्कीच श्रेयस अय्यर असे असू शकते कारण श्रेयस हा नेहमीच थंड डोक्याने खेळणारा खेळाडू आहे. तो समोरच्या संघाकडे किती महान फलंदाज किंवा गोलंदाज आहेत हे बघत नाही, तर आपला संघ यांच्या विरुद्ध कसा विजय मिळवू शकतो याचा विचार करतो. त्या दृष्टीने तो त्याची व्युवरचना आखत असतो.
छोट्या-छोट्या हाणामारीने तो स्वतःचा संयम सोडून देत नाही, तर मैदानावर घट्ट पाय रोऊन उभा राहतो. या सर्व गोष्टींची हार्दिक पंड्यामध्ये उणीव भासते. श्रेयससाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्याला पोंटिंगसारख्या धूर्त खेळाडूची साथ आहे. तसेच मुंबई इंडियन्सकडे एक अनुभवी खेळाडू आहे जो श्रेयसच्या रणनीतीत उत्तर देऊ शकतो; परंतु सध्या हार्दिक पंड्या त्या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून बाहेरच ठेवतो. तुम्हाला समजलेच असेल की, तो खेळाडू कोण आहे, हो तो म्हणजेच रोहित शर्मा. ज्याच्याकडे क्रिकेटमधील अनुभवाचा गाढा अभ्यास आहे. पण सध्यातरी मुंबई इंडियन्स त्याचा फक्त फलंदाजीसाठी वापर करते. चला तर जाणून घेऊयात आज कोणत्या कर्णधाराची खेळी उत्तम ठरते !