

कांदळवन क्षेत्र भूमाफियांच्या अतिक्रमणातून मुक्त
ठाण्यात वन विभागाची धडक कारवाई ठाणे :ठाणे खाडीच्या किनारपट्टीवर विस्तारलेली कांदळवन परिसंस्था ही जैवविविधतेसाठी अत्यंत समृद्ध व पर्यावरण ...
सरकारी पोर्टलवर तसेच पालिका प्रशासनाकडे फोटोसह दिलेल्या तक्रारीत सामाजिक कार्यकर्ते सचिन जांभळे यांनी नमूद केले आहे की, आगार परिसरात काही ठिकाणी अग्निशमन यंत्रे ठेवलेली आहेत मात्र ही सर्व यंत्रे निकामी झालेली आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठी दुर्घटना घडू शकते. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र सर्व्हर रूम किंवा लाईव्ह स्क्रिमिंग मॉनिटर स्क्रिन बंद असल्याने या सीसीटीव्हीचा उद्देश सफल होत नाही. आगार परिसरात परिवहन बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे; परंतु या चार्जिंग स्टेशन भोवती सुरक्षा भिंत तसेच सुरक्षा रक्षक नाही. आगारात कर्मचारी विश्रांती गृह आहे मात्र विश्रांती घेण्यासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध नाही. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
याच बरोबर परिवहन सेवा सुध्दा अनियमित झाली असल्याची तक्रार अनेक प्रवासी करत आहेत. परिवहन सेवेच्या अनेक डिझेल बस यांत्रिक बिघाडामुळे दररोज रस्तोरस्ती बंद अवस्थेत उभ्या असतात. तसेच काही इ-बससुद्धा बंद पडलेल्या असतात, तर इलेक्ट्रिक बस चार्जिंग नसल्यामुळे ठाण्यावरून कोणताही थांबा न घेता थेट डेपोमध्ये आणल्या जात आहेत. तसेच त्या पूर्ण चार्ज न करताच पुढे चालविण्यात येतात. या सर्व गोंधळामुळे प्रवाशांचे हाल होतात. हे सर्व पाहता परिवहन उपक्रमातील बस डेपो व इमारती बाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची तातडीने तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी असे पत्र सहाय्यक आयुक्त (परिवहन) यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठविले आहे.