
पहाटेपासून पाऊस सुरू असल्यामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्गावर गाड्या दहा ते वीस मिनिटे विलंबाने धावत आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत, खोपोली, बदलापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या लोकल विलंबाने धावत आहे.तसेच मुंबईहून कल्याण, कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्याही विलंबाने धावत आहेत. मुंबईच्या आसापसच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाचा जोर वाढताच वीज खंडीत केली जात आहे. काही ठिकाणी वारे ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहत आहेत. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.