
सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे आयटी क्षेत्रात ले-ऑफमुळे किती कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि किती जाणार आहेत. माययक्रोसॉफ्ट कंपनी ही अशीच एक नावाजलेली कंपनी आहे आणि त्यामधून ६०० ० कर्मचाऱ्यांची ले-ऑफ द्वारा कपात झाली आहे. यामुळे त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह, तर निर्माण झालेच आहे पण या निर्णयामुळे एआयने कंपनीच्या गरजांमघ्ये कोणत्या स्वरूपाचा बदल घडवला आहे आणि त्याचे भारतावर काय परिणाम होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. मायक्रोसॉफ्टने आपल्या ६००० कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर एक बाब स्पष्ट झाली आहे ती म्हणजे एआय म्हणजे आर्टिफिशीअल इंटलिजन्सने नोकऱ्यांचे भवितव्य बदलून टाकले आहे. अनेक नोकऱ्या आज अस्तित्वात नाहीत किंवा त्यांची गरज उरली नाही. हा गंभीर प्रश्न आहे. कारण भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. येथे रोजगारक्षम तरुणांची संख्या ६४.४ टक्के आहे असे मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे भारत हा तरुणांचा देश आहे आणि त्यामुळे येथे विकसित देश होण्याची संधी अधिक आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी सहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकते याला फार वेगळा अर्थ आहे. तो आहे की, यापुढे सरकारी नोकऱ्या हे भविष्य नाही, तर खासगी संस्थांमध्ये नोकऱ्या करणे आणि त्या टिकवण्यासाठी तसे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे
बनले आहे.
एआयमुळे आपल्या श्रमविषयक गरजा बदलल्या आहेत आणि त्यात आता नवीन विकास आणि अनुसंधान क्षेत्राकडे जाण्याची गरज निर्माण झाली आहे. कंपनीने एका वित्त वर्षात ८० अब्ज डॉलरची गुंतवणुकीची योजना बनवली आहे. त्यामुळे कंपनीला वेतन बिलात सातत्याने कमी येऊ शकते. गुगलच्या मुळ कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनीने याआधीच या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्यांनी एका वेळेला काही शे कर्मचाऱ्यांना कपात करण्याचे धोरण स्वीकारले आहे आणि काही खास शाखांवर लक्ष केंद्रित केले आहे. तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर मायक्रोसॉफ्ट कंपनी एका झटक्यात आपल्या तीन टक्के कर्मचाऱ्यांना कपात करत आहे, तर गुगलमध्ये ते लहानशा स्तरावर होत आहे. पण या निर्णयाची दिशा स्पष्ट आहे. ती म्हणजे कर्मचाऱ्यांना आता कोणतेही सुरक्षित भविष्य उरलेले नाही. त्यांना जर नोकरी टिकवायची असेल, तर त्यांनी आवश्यक ते कौशल्य शिकावे लागेल आणि ज्या कर्मचाऱ्यांचे वय जास्त झाले आहे किंवा ज्यांची दुसरी एखादी अडचण आहे, त्यांना नव्या तरुणांसाठी जागा करून द्यावी लागेल. ज्या बड्या कंपन्या आहेत त्यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी एआयला स्वीकारावे लागेल आणि त्यांना एआयच्या विकासावर जोर द्यावा लागेल. भारतात या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण धडा आहे आणि तो म्हणजे कारभाराच्या क्षेत्रात एआयचा व्यापक उपयोग करून घेता येतो. त्याचा प्रभाव जास्त आता जाणवू लागला आहे आणि हे क्षेत्र दीर्घ काळापासून निर्यात आणि नियोक्ता क्षेत्रातून कमाई करणारे क्षेत्र होते ते आता कंपनीवर आता फुकटचे ओझे नको म्हणून या क्षेत्राला एआय स्वीकारावे लागेल आणि एआयचा विकास करावा लागेल. कर्मचाऱ्यांची कपात करावी लागली तरीही बेहतर पण या कंपन्याना टिकायचे असेल, तर हे करावेच लागेल.
पूर्वी कॉल सेंटर आणि लोकांकडून समर्थित ग्राहक सेवा संपत आल्या आहेत आणि त्यांची जागा आता एआय आणि इतरांनी घेतली आहे. ज्यात मानवी श्रमांचा वापर जास्त होत नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कामात कमी येणार आहे. लोक बेकार होतील पण त्यांचे काम ही कमी होणार आहे. अनेक ग्राहकोपयोगी सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत ज्यानी एआयचा वापर करून अनेक कामगारांची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे कामे जलदीने आणि व्यवस्थित होतात. पण भारतातील डाव्या कामगार संघटनांना हे मान्य होणार नाही.
भारतातील एका कंपनीत ३० ते ४० टक्के काम एआय करू शकते. ही बातमी वाईट आहे की चांगली आहे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण ही वस्तुस्थिती आहे. लोकांचे काम ३० ते ४० टक्के कमी झाले आहे आणि तितक्याच प्रमाणात बेरोजगारी वाढणार आहे. हा धोका आहेच. पण आपल्याला व्यापक एआयच्या प्रभावाशी मुकाबला करण्यास तयार राहिले पाहिजे. अनुमान असे सांगतात की देशात जबळपास १५ लाख कॉल सेंटर एजंट आहेत आणि कोविड महामारीनंतर त्यांची संख्या दुप्पट वाढली आहे. त्यातील अनेक देशांतर्गत मागणीवर केंद्रित आहेत.
ग्राहक या सेंटर्सबाबतीत अधिक जागरूक झाले आहेत आणि त्यामुळे त्याना अधिक चांगली सेवा द्यावी लागेल. पण हा प्रश्न आहे की नोकऱ्यांचे काय होईल... कारण काही कॉलसेंटर एजंट्स चांगले प्रशिक्षक बनू शकतात. पण सुरुवातीला नोकऱ्यात कमी येईल हे सत्य आहे, पण नंतर काही तरी चांगले घडेल. पण विशिष्ट क्षमता आणि कौशल्याशिवाय नोकरी करू शकणार नाहीत. त्यामुळे तरुणांना आपण जास्तीत जास्त रोजगारास अधिक लायक कसे बनू हे पाहावे लागेल. हाच या साऱ्या विवेचनाचा अर्थ आहे. यापूर्वीही असे पेचाचे प्रसंग आले होते.
नवीन मिल्स भारतात सुरू झाल्या तेव्हा मेन की मशीन असा संघर्ष निर्माण झाला होता. पण त्यात लोकांच्या नोकऱ्याही गेल्या नाहीत आणि मशिन्सचा वापरही वाढला, बीआर चोप्रा यांचा चित्रपट नया दौर या कल्पनेवर आधारित होता. त्या वेळी जो संघर्ष सुरू झाला आणि तोच संघर्ष आताही होत आहे. पण तेव्हा जुना काळ होता आणि आता नया दौर आहे पण संघर्ष तोच आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे एआय हे भारतासाठी केवळ तंत्रज्ञान नाही तर तरुणांच्या प्रगतीसाठी मोठी संधी आहे.
कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रामुळे भारतीय तरुणांसाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते. पण एक बाब मात्र स्पष्ट आहे ती म्हणजे आयटी क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची कपात ही वर्तमानपत्रांच्या बातम्यांचे मथळे बनत आहेत. एआयपासून भविष्यात कितपत धोका आहे असे विचारल्यावर प्राईसवॉटर हाऊसने म्हटले होते की गेल्या तीन वर्षात ३०० दशलक्ष नोकऱ्या जाण्याची भीती होती. आता ती खरी ठरली आहे.
पण यातूनही आशेचा किरण आहेच तो म्हणजे भारतातील तरुण रोजगार क्षम आहेत आणि त्यांनी जर नवीन कौशल्य म्हणजे एआयचे तंत्र आत्मसात केले, तर त्यांना नोकऱ्या जाण्याची भीती नाही. उलट त्यांना अधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. पण सरकार आणि तरुणांनी यात पुढाकार घेतला पाहिजे.