मुंबई :भारतामध्ये जवळपास ५० दशलक्ष भारतीय, विशेषतः महिला, थायरॉइड विकारांनी ग्रस्त आहे आणि हे प्रमाण दरवर्षी मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये वाढताना दिसत आहे, असे आरोग्यविषयक शासकीय आकडेवारी व निदान करणाऱ्या प्रयोगशाळांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येते.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-४ ने असे आढळले की, महाराष्ट्रातील १.८ टक्के महिलांना २०१५-२०१६ मध्ये गालगुंड किंवा इतर थायरॉइड विकार होते आणि एनएफएचएस-५ नुसार तीन वर्षांनी हे प्रमाण २.१ टक्के पर्यंत वाढले आहे. भारतात आरोग्य संस्थांच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण २.२ टक्क्यांवरून २.७ टक्के पर्यंत वाढलेले दिसते. आयोडीनची कमतरता, विशेषतः अंतर्गत भागांमध्ये, थायरॉइड विकारांचे एक मुख्य कारण आहे. आहारातील बदल, जीवनशैलीतील बदल, आणि पर्यावरणीय घटक देखील थायरॉइड विकारांच्या वाढीस कारणीभूत ठरतात. थायरॉईड विकारांची वाढती संख्या लक्षात घेता, नियमित तपासणी, योग्य आहार, आणि सततची वैद्यकीय देखरेख आवश्यक आहे.
          मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने ...
विशेषतः महिलांनी आणि वयस्कर व्यक्तींनी थायरॉइड तपासणीसाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. लीलावती हॉस्पिटल, वांद्रे येथील ज्येष्ठ एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी म्हणाले की, वाढलेली संख्या ही लोकांमधील या आजाराविषयची वाढती जागरूकता आणि थायरॉइड निदान चाचण्यांमुळे दिसून येते. ऑटोइम्युनिटी ही संपूर्ण जगभर वाढत आहे आणि भारतही याला अपवाद नाही, परंतु थायरॉइड विकारांच्या संख्येमध्ये वाढ होणे हे जागरूकता आणि निदानाचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले. आजच्या महिला एकाच वेळी अनेक कामं करतात आणि तणावांमुळे थायरॉइड विकारांची शक्यता वाढत असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

    




