Georgian Visa : भारतीयांसाठी जॉर्जियाचे व्हिसा धोरण शिथिल!

काकेशस प्रदेशातील निसर्गरम्य देश म्हणजे जॉर्जिया. याच जॉर्जियाने भारतीयांसाठी एक खूशखबर दिलीय. जॉर्जियाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा धोरण शिथिल केलंय. चला पाहूयात या लेखातून नेमकं धोरण काय आहे आणि भारतीय पर्यटकांना त्याचा कसा फायदा होणार आहे.


?si=NqOUxMLPuovNJo_9


भारतीय पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काकेशस प्रदेशातील जॉर्जियाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा धोरण शिथिल केलंय. त्यामुळे आता जॉर्जियाचा निसर्गरम्य प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार आहे. ज्यांच्याकडे अमेरिका, युनायटेड किंगडम, शिंजेन क्षेत्र किंवा जपानचा वैध व्हिसा किंवा वास्तव्य परवानगी आहे त्यांना जॉर्जियात व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे. त्यांना जॉर्जियात ९० दिवसांपर्यंत व्हिसामुक्त राहण्याची परवानगी मिळणार आहे. हे धोरण २०२५ मध्ये लागू झालंय. हे धोरण पर्यटन वाढवण्यासाठी आणि भारत-जॉर्जिया संबंध मजबूत करण्यासाठी आखलं गेलंय. जॉर्जियाच्या व्हिसा धोरणाचे भारतीयांसाठी फायदे होणार आहेत. या धोरणामुळे भारतीय पर्यटकांना जॉर्जियाच्या निसर्गसौंदर्याचा, ऐतिहासिक वारशांचा आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेता येणार आहे.



टबिलिसी, बातुमी, कॉकेशस पर्वतरांगा आणि जॉर्जियन वाईन यांसारख्या आकर्षणांची अनुभव घेण्यासाठी कमी खर्चात प्रवास करणं शक्य झालंय. ज्यांच्याकडे व्हिसा नाही त्यांच्यासाठी वैकल्पिक व्हिसा अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे. यासाठी पासपोर्ट आकाराचे फोटो, पासपोर्टची स्कॅन कॉपी, आधारकार्ड, पॅनकार्ड, आर्थिक कागदपत्रं आवश्यक आहेत. अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेऊन अर्ज करता येतो. त्यामुळे तुमची फसवणूक होत नाही.या धोरणामुळे जॉर्जियात भारतीय पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. हे धोरण जॉर्जियाला कॉकेशसचा प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाऊ शकते.


विशेषतः टबिलिसी, बातुमी आणि कॉकेशस पर्वतरांगा यांसारख्या ठिकाणी पर्यटन वाढण्याची शक्यता आहे. जॉर्जियाच्या या नव्या व्हिसा धोरणामुळे भारतीय प्रवाशांसाठी काकेशसचा मार्ग खुला झालाय. या धोरणामुळे फक्त पर्यटन वाढेल असं नाही तर भारत-जॉर्जिया संबंधांना बळकटी मिळेल. भारतीय पर्यटकांनी आता आपल्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये जॉर्जियाचा समावेश करावा.

Comments
Add Comment

FASTag Rules : आता टोल नाक्यावरुन सुसाट जा...! फास्टॅगच्या 'KYV' कटकटीतून कायमची सुटका; NHAI चा मोठा निर्णय.

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI)

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच बदल

प्रयागराज : शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची तयारी

‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी

१०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्रीस मनाई नवी दिल्ली : सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा

ॲमेझॉनच्या भारतातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी

एच १-बी व्हिसाच्या कठोर नियमांमुळे कामात बदल नवी दिल्ली : ॲमेझॉनने व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भारतात

बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

१५ ऑगस्ट २०२७ ला धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा