Friday, October 24, 2025
Happy Diwali

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी खाल्ला बायकोचा मार! घरचे भांडण जगासमोर

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी खाल्ला बायकोचा मार! घरचे भांडण जगासमोर

हनोई: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (French President Emmanuel Macron) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते फ्लाइटमधून उतरत असताना त्यांची पत्नी त्यांच्या कानशीलात लगावताना दिसत आहे.  हा व्हायरल व्हिडिओ व्हिएतनामची राजधानी हनोईचा आहे, जिथे फ्रान्सचे अध्यक्ष त्यांच्या पत्नीसह राज्य दौऱ्यावर आले होते.

पुरुष कितीही शक्तिशाली किंवा सामर्थ्यवान असला, तरी त्याचे बायकोसमोर काही चालत नाही. असेच काहीसे सांगणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फ्रेंचच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांची बायको सर्वांसमोर त्यांच्या श्रीमुखात लगावत असताना दिसते. सुरुवातीला फ्रेंच राष्ट्रपती भवनातून हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगत तो AI द्वारे तयार केल्याचे म्हटले गेले होते, मात्र त्यानंतर हा व्हिडिओ खरा असल्याचे सिद्ध झाले.  राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या एका जवळच्या मित्राने याला एक साधे "नवरा बायकोचे भांडण" असे म्हंटले आहे.

पत्रकारांच्या गर्दीत फ्रान्स राष्ट्राध्यक्षांना पत्नीने थोबाडावले, व्हिडिओ झाला व्हायरल

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीमध्ये झालेले खाजगी भांडण व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आले आहे.  मॅक्रॉन विमानातून बाहेर पडत असताना त्यांच्या पत्नीने त्यांना सनसनीत कानाखाली मारल्याची या व्हिडिओमधून दिसून येते.

व्हिडिओत दिसते की विमानाचा दरवाजा उघडताच, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अचानक मागे सरकतात,आणि त्यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन त्यांना चापट मारते. दरम्यान, अध्यक्ष मॅक्रॉन यांना लगेच लक्षात येते की खाली पत्रकारांची गर्दी आहे आणि कॅमेरे चालू आहेत, म्हणून ते थोडेसे हसतात, हात हलवतात आणि नंतर विमानात जाऊन लपतात. काही वेळानंतर राष्ट्राध्यक्ष विमानातून बाहेर पडतात. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी एकमेकांचा हात न धरता खाली उतरताना दिसतात. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकतात की,  पत्रकारांसमोर बायको अजून काही गडबड तर करणार नाही ना, ही भीती मॅक्रॉन यांच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसून येते. ते खूपच अस्वस्थ दिसून आले.

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या लग्नाची कहाणी देखील जगप्रसिद्ध

पत्नीचा मार खाणाऱ्या फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या लग्नाची कहाणी देखील जगप्रसिद्ध आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिजिट यांच्या वयात २४ वर्षांचा फरक आहे. मॅक्रॉनच्या पत्नी बिगिट या पूर्वी शिक्षिका होत्या, तर  इमॅन्युएल मॅक्रॉन त्यांचे विद्यार्थी होते. मॅक्रॉन आणि ब्रिजिट शाळेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन फक्त १५ वर्षांचे होते तर ब्रिजिट यांचे वय जवळपास ३९ वर्षांची होते. तसेच ब्रिजिट आधीच विवाहित होत्या आणि त्या तीन मुलांची आई देखील होत्या.

24 वर्षाहून मोठ्या ब्रिजिट सोबत लग्न

16 वर्षाच्या इमॅन्युएल मॅक्रॉनने ब्रिजिटला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. पण मॅक्रॉनच्या कुटुंबाला हे नाते अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे त्यांचे लग्न खूपच वादग्रस्त ठरले. त्यांच्या समाजातही लग्नाला खूप विरोध होता. ब्रिजिटने मॅक्रॉनशी लग्न करण्यासाठी त्यांच्या पतीला घटस्फोट दिला. २००७ मध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन २९ वर्षांचे आणि ब्रिजिट ५४ वर्षांच्या असताना दोघांनी लग्न केले. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका खाजगी समारंभात हे लग्न झाले. २०१७ मध्ये जेव्हा इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष झाले तेव्हा ब्रिजिट फ्रान्सच्या फर्स्ट लेडी बनल्या. त्या अजूनही मॅक्रॉनच्या यांच्या पत्नी म्हणून सार्वजनिक जीवनात खूप सक्रिय भूमिका बजावतात आणि त्यांच्या जवळजवळ प्रत्येक परदेश दौऱ्यांमध्ये त्यांच्यासोबत असतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >