Saturday, October 25, 2025
Happy Diwali

शक्ती चक्रीवादळाचा कहर! कोकणात रेड अलर्टचा इशारा

शक्ती चक्रीवादळाचा कहर! कोकणात रेड अलर्टचा इशारा

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, येत्या ३६ तासांत ‘शक्ती’ हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे सरकणार आहे. हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

२० मेपासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, तळकोकणात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. २७ मेपर्यंत पावसाचा इशारा कायम आहे.

आज पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत पावसाची तीव्र शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >