सामोडे चौफुलीवर पाण्यासाठी रास्ता रोको

  11

पिंपळनेर : ऐन उन्हाळ्यात सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत त्याची दखल घेत नसल्यामुळे संतप्त महिलांनी अखेर विविध भांडे हातात घेऊन सामोडे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले.


रास्ता रोकोमुळे तब्बल एक ते दीड तास पिंपळनेर-सटाणा, पिंपळनेर- साक्री, पिंपळनेर- नवापूर या मार्गावर वाहनांच्या लांबच- लांब रांगा लागल्या होत्या. पाण्यासाठी महिलांनी वारंवार तक्रार करूनही पाण्याचे नियोजन होत नसल्याने अखेर परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येत शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. शनिवारपासून सुरळीतपणे नियमित पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन सामोडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी दीपक भारुड यांनी दिले. आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आपले रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.


वारंवार करावे लागते आंदोलन : स्थानिक महिलांनी २१ मे रोजी देखील सामोडे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला होता त्यावेळी देखील ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना आश्वासन देण्यात आले होते. वारंवार येथील ग्रामस्थांना आश्वासनावर समाधान मानावे लागते.म्हणून संतप्त ग्रामस्थांनी थेट रास्ता रोको आंदोलन केले.

Comments
Add Comment

आई एकविरा मंदिरात भाविकांना सात जुलैपासून ड्रेस कोड, तोकडे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश नाही

पिंपरी-चिंचवड : कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला

गर्भधारणेपूर्व तपासणीचे महत्त्व

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा ही स्त्रीच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील प्रक्रिया

Railway ticket price : रेल्वेच्या तिकिट दरात वाढ, तत्काळ बुकिंगसाठी नवीन नियम जारी...

मुंबई : देशभरातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने अनेक कालावधीनंतर भाडेवाढ करण्याचा निर्णय

हुश्श! इराणकडून युद्धविरामाची घोषणा

तेहरान: इस्रायल आणि इराणमध्ये मागच्या १२ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. अमेरिकेचे

मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत.

ST Corporation Decision : एसटी मालवाहतूक सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय...

मुंबई : करोना काळात एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पादनात (ST  वाढ व्हावी यासाठी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु केली