शहरातील पादचारी, सायकलस्वारांसाठी रस्ते अधिक सुरक्षित बनणार

  28

‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पाअंतर्गत काम होणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते अधिक सुरक्षित व सर्वसमावेशक बनवण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत दापोडी, निगडी प्राधिकरणसह शहरातील विविध भागातील रस्ते नागरिकांसाठी सुरक्षित, वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी बनवण्यात येत आहेत. या रस्त्यांवर सलगपणे चालताना पादचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याला प्राधान्य दिले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नागरिकांना/पादचाऱ्यांना सलगपणे समपातळीत सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीशी सुसंगत हे रस्ते असतील, याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर देखील पादचारी नागरिकांसाठी विनाअडथळा फुटपाथ, स्वतंत्र सायकल ट्रॅक, बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासोबत सुरक्षितपणे नागरिकांना रस्ता ओलांडता येईल, यादृष्टीनेही उपाययोजना करण्यात येत आहेत. हा प्रकल्प राबवताना पथदिवे, चौकांची नव्याने रचना, सेवा वाहिन्या याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.

ही सर्व कामे ‘इंडियन रोड्स काँग्रेस’ (आयआरसी)च्या मानकांनुसार केली जात आहेत. पॅरिस, कोपनहेगन आणि अ‍ॅमस्टरडॅम अशा शहरांनी पादचारी आणि सायकलस्वार यांच्यासाठी रस्त्यावर प्रवास सुरक्षित असावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या शहरांप्रमाणेच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पादचारी व सायकलस्वारांसाठी सुरक्षित रस्ते बनवण्यास प्राधान्य देत आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे रस्ते केवळ वाहनांसाठी नाही, तर पादचारी, सायकलस्वार यासह सर्वांसाठी सुरक्षित असतील, याकडे प्राधान्याने लक्ष देत आहोत. शहरातील रस्ते सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. रस्त्यांची कामे करताना सार्वजनिक-खासगी वाहनांसोबतच पादचारी, सायकलस्वार नागरिक यांचाही विचार केला जात आहे.

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागातील रस्ते अरुंद झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर वाहनचालकांप्रमाणेच पादचारी, सायकलस्वार यांनाही रस्त्यांवरील प्रवास सुरक्षित करून देणे यास प्राधान्य देऊन आम्ही रस्त्याच्या लगत असलेली व वापरात नसलेल्या जागेचे पुनर्वितरण करून आणि पार्किंग व वाहन मार्गांची योग्य रचना करून रस्ते अधिक सुरक्षित व वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे बनवण्यास प्राधान्य देत आहोत.

- बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता,

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरात दर १०० लोकांमागे ९० खासगी वाहने आहेत. त्यामुळे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे की, रस्ते रुंद करणे ही शाश्वत उपाययोजना नाही. असा उपाय करणे तात्पूरता मार्ग आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाय करण्याच्या दृष्टीने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प प्राधान्याने राबवला जात आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसोबतच, पादचारी, सायकलस्वार यांचाही विचार करण्यात आला आहे.

- सुनील पवार, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Comments
Add Comment

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे