Sunday, May 25, 2025

महाराष्ट्र

हगवणे बंधूंचा शस्त्रपरवाना रद्द करण्याचा प्रस्ताव

हगवणे बंधूंचा शस्त्रपरवाना रद्द करण्याचा प्रस्ताव

पुणे : ‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कस्पटे कुटुंबीयांना धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी नीलेश चव्हाण, तसेच शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे,’ अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. चव्हाण आणि हगवणे यांना पुणे आयुक्तालयातून शस्त्र परवाना देण्यात आला होता. परवाना रद्द करण्याच्या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर सुनावणी होईल. त्यानंतर वैध कारण आढळून आल्यास संबंधितांचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे.

Comments
Add Comment