
"ना स्क्रिप्ट मिळाली, ना कथा कळली, IPLच्या नावाखाली प्रोमो शूट झाला" परेश रावलने सांगितले 'हेरा फेरी ३' सोडण्याचे खरे कारण
Paresh Rawal opens up on exiting Hera Pheri 3: परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडल्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अक्षय कुमारच्या कंपनीने झालेल्या नुकसानीसाठी २५ कोटी रुपयांची भरपाई मागणारी कायदेशीर नोटीसही पाठवली. त्यावेळी हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हंटलं जात होतं, मात्र आता परेश रावल यांकडून हा चित्रपट आपण का सोडत आहोत याचे कारण समोर आलं आहे.
हेरा फेरीचा पहिला आणि दूसरा भाग गाजवण्यात परेश रावल यांनी साकारलेल्या बाबुरावचा सर्वात मोठा हात आहे. त्यामुळे हेरफेरीच्या तिसऱ्या सिक्वेलमध्ये ही तिकडी काय कमाल करते? याची उत्कंठा लोकांमध्ये आहे. मात्र, यादरम्यान परेश रावल 'हेरा फेरी ३' सोडत असल्याचा मुद्दा गाजला. परेश रावल यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अक्षय कुमारने चित्रपटाच्या नुकसानीसाठी २५ कोटी रुपयांची भरपाई मागणारी कायदेशीर नोटीसही त्यांना पाठवली. पण असे नेमके काय घडले? परेश रावल यांनी हेरा फेरा 3 मधून माघार का घेतली? असे अनेक प्रश्न लोकांना पडले होते. आता या प्रश्नाचे उत्तर स्वतः परेश रावल यांच्याकडून आलं आहे.
परेश रावल यांनी संपूर्ण प्रकरणावर सोडले मौन
परेश रावल यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपले मौन सोडले आहे आणि म्हटले आहे की 'हेरा फेरी ३' पासून वेगळे होण्याबाबतचे उत्तर कायदेशीर पद्धतीने पाठवण्यात आले आहे, त्यानंतर ही संपूर्ण चर्चा शांत होईल. परेश रावल यांनी रविवारी सकाळी एक इंस्टाग्राम पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये लिहिले होते, "माझे वकील अमीत नाईक यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याच्या आणि सोडण्याच्या माझ्या अधिकाराबाबत योग्य उत्तर पाठवले आहे."
My lawyer, Ameet Naik, has sent an appropriate response regarding my rightful termination and exit. Once they read my response all issues will be laid to rest.
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 25, 2025
परेश रावल यांच्या वकिलाने मांडली बाजू
परेश रावल यांचे वकील अमित नाईक यांची कंपनी नाईक अँड नाईक यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की परेश रावल यांना स्क्रिप्ट मिळाली नाही आणि त्यांना कथेबद्दल काहीही सांगितले गेले नाही. प्रोमो आयपीएलमध्ये दाखवावा लागेल असे सांगून शूट करण्यात आला होता.
परेश रावल यांनी कराराची रक्कम परत केली होती
नाईक अँड नाईक कंपनीच्या वतीने असे म्हटले गेले की, "नोटीस मिळण्यापूर्वीच परेश रावल यांनी ११ लाख रुपये परत केले होते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्याकडून पैसे परत घेतले होते. याचा थेट अर्थ असाच होतो की, परेश रावल यांचे काम रद्द करण्यात आलं आहे." त्यानंतर कंपनीने परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या अनेक पैलूंबद्दल भाष्य केले. यामागील एक कारण म्हणजे चित्रपट फ्रँचायझीचे शीर्षक अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहे, कारण या फ्रँचायझीचे मुख्य मालक फिरोज नाडियाडवाला यांनी २९ मार्च रोजी परेश रावल यांना नोटीस पाठवली होती.
आयपीएलच्या नावाखाली प्रोमो शूट
परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे कथा, पटकथा आणि दीर्घ स्वरूपाचा करार, जो तयार करण्यात आला नव्हता आणि परेश रावल यांना देण्यात आला नव्हता, जो आवश्यक होता. चित्रीकरण २०२६ मध्येच सुरू होणार होते. कथेअभावी, प्रोमो घाईघाईत शूट करण्यात आला आणि सांगण्यात आले की तो आयपीएलमध्ये दाखवावा लागेल. वकिलाच्या म्हणण्यानुसार, अक्षय कुमारच्या आगामी 'भूत बांगला' चित्रपटाच्या सेटवर काही बदल करण्यात आले होते आणि प्रोमो तिथेच शूट करण्यात आला होता.
असेही म्हटले जात होते की परेश रावल यांनी कथा, पटकथा आणि करार देण्यात येईल असे आश्वासन देऊन चित्रपटावर स्वाक्षरी केली होती, परंतु त्यांना काहीही देण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत, परेश रावल यांना विश्वासार्हता राहिली नाही. त्यामुळे त्यांनी टर्म शीट संपवून चित्रपट सोडला. परेश रावल यांच्या वकिलांनी पुढे असे देखील म्हंटले आहे की, चिटपट पुढे जाण्यासाठी कथानकासारखी प्रमुख गोष्टच तयार नव्हती, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नुकसान भरपाईचा दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.