
श्वेता कोरगावकर
कोणतेही नाते हे प्रेमळ स्वभाव, आपलेपणा व परस्परांमधील विश्वास यावर अवलंबून असते. त्या नात्याला निःस्वार्थ भावनेची जोड असेल तर ते अधिक दृढ होते. राणे कुटुंबीयांशी माझा संबंध अगदी हल्लीचा. लोकसभा निवडणुकी वेळी राणे कुटुंबीयांना अत्यंत जवळून पाहता आले. अनुभवता आले. खासदार राणे साहेब हे अत्यंत कडक शिस्तीचे व स्वभावाने कणखर असे ऐकिवात होते. भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाची धुरा माझ्या खांद्यावर होती. त्यामुळे त्यांच्याकडे जाताना मनात प्रचंड भीती होती. पण मी अनुभवले ते अगदी उलट होते. राणे साहेब व निलम वहिनी या अत्यंत प्रेमळ, भावनिक. घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य राखणे हा राणे कुटुंबीयांचा स्वभाव अनुभवता आला.
लोकसभा निवडणुकी वेळी सौ. निलम ताईंबरोबर फिरण्याचा भरपूर योग आला. राणे साहेबांना विजयी करण्यात निलम ताईंचे योगदान खूप मोठे आहे. निलम वहिनी मला रोज रात्री दुसऱ्या दिवशीचा दौरा सांगत. मला आवर्जून सभेला येण्यासाठी सांगायच्या. त्या उत्कृष्ट पत्नी, आई, आजी व सासू आहेत. दोन्ही सुनांना त्या अगदी मुलींप्रमाणे वागवतात. त्यांची काळजी घेतात.
राणे कुटुंबीयांमध्ये राणे साहेबांचा शब्द व निर्णय महत्त्वाचा मानला जातो. तसेच निलम ताईंचा निर्णय हा अंतिम व सर्वमान्य आहे. अगदी राणे साहेब सुद्धा त्यांच्या निर्णयाचा आदर करतात हे मी अगदी जवळून पाहिलंय. निलम वहिनी व कुटुंबीयांकडून मला भरपूर आस्था, प्रेम, आपुलकीची वागणूक मिळाली. निलम ताईंबरोबरच राणे साहेब, पालकमंत्री नितेश साहेब, आमदार निलेश साहेब यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मी मूळ भाजपा पक्षाची. राणे साहेब हे रोखठोक बोलणारे, कडक स्वभावाचे, आक्रमक स्वभाव असे ऐकिवात होते. भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर राणे साहेबांना भेटण्याचा योग आला. राणे कुटुंबीयांना जवळून अनुभवायला मिळाले. राणे कुटुंबीय म्हणजे एक दिलखुलास कुटुंब. राणे साहेबांचा स्वभाव अत्यंत मृदू. कार्यकर्ता कसा जपावा हे साहेबांकडून शिकावं. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक समस्या, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची त्यांची पद्धतच वेगळी. कार्यकर्त्याला कठीण प्रसंगात मदत करणे, त्यांच्या सुखदुःखात सामील होणे यात राणे कुटुंबीय अग्रेसर आहेत.
निलम वहिनी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, जिजाऊ महिला संस्थाध्यक्ष म्हणून सक्षमपणे कारभार सांभाळत आहेत. पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलचा डोलाराही त्या सांभाळत आहेत. बंगल्यावर साहेबांना भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समस्या त्या आपुलकीने जाणून घेतात. त्यांना धीर देतात. प्रसंगी आर्थिक मदतीचा हात देतात. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! परमेश्वर त्यांना उदंड व निरोगी आयुष्य देवो, ही श्री बांदेश्वर चरणी प्रार्थना!