Sunday, May 25, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पाच विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची घोषणा

पाच विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची घोषणा
नवी दिल्ली : पाच विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून ही घोषणा केली आहे. गुजरातमधील दोन तर केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

गुजरातमध्ये करसनभाई पंजाभाई सोलंकी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कडी (एससी) तसेच भायनी भूपेंद्रभाई गंधूभाई यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विसावदर येथे पोटनिवडणूक होणार आहे. केरळमध्ये पीव्ही अन्वर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या निलांबूरमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. गुरप्रीत गोगी बस्सी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंजाबच्या लुधियाना पश्चिम येथे पोटनिवडणूक होणार आहे. नसिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पश्चिम बंगालमधील कालीगंज येथे पोटनिवडणूक होणार आहे.

पोटनिवडणुकीची अधिसूचना २६ मे रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ जून आहे आणि अर्जांची छाननी ३ जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ५ जून आहे. मतदान १९ जून रोजी होईल. मतमोजणी २३ जून रोजी होईल.

Comments
Add Comment