
कर्जत :कर्जत शहरात शनिवारी दिवसभर मुख्य रस्त्यावर अनेकदा मोठी वाहतूक कोंडी घडली.दीड किलोमीटरच्या अंतरात तब्बल अर्धा-अर्धा तास वाहने अडकून पडली होती.त्यात दुपारी मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साठल्याने आणखीच भर पडली.शनिवारी लग्न तिथी पण मोठी असल्याने वाहनांची संख्या रस्त्यावर अधिक होती.
कर्जत शहरात मागील आठ दिवसांपासून सतत वाहतूक कोंडी जाणवत आहे. सकाळपासूनच नगर-बारामती मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कुळधरण रोड आणि अंतर्गत रोड देखील अनेक वेळा जाम झाले होते. दुपारी अडीच वाजता अवकाळी मुसळधार पावसाळा सुरुवात झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने सखल भागात जलाशयाचे स्वरूप आले होते. त्याने वाहतुक कोंडीत आणखीच भर पडली. शहरातून तब्बल दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्धा-अर्धा तास वाहनांना वेळ लागला. तिन्ही रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा दिवसभर पाहायला मिळाल्या. त्यात शनिवारी लग्न तिथी मोठ्या असल्याने बाहेरील वाहनांची संख्या अधिक होती.
त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.अनेक वर्षांपासून कर्जतला पर्याय रिंगरोडची मागणी वाहन चालकांमधून पुढे येत आहे. मात्र यावर प्रशासन ठोस उपाययोजना करण्याची मानसिकतेमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे कर्जतकरांना वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.