Sunday, May 25, 2025

कोकणमहत्वाची बातमी

Gas Tanker Overturned: ताम्हिणी घाटात विषारी गॅसचा टँकर पलटला

Gas Tanker Overturned: ताम्हिणी घाटात विषारी गॅसचा टँकर पलटला

पुणे दिघी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प


माणगांव: पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या डोंगरवाडी गावच्या हद्दीतील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat Accident) गॅस टँकर पलटी झाल्यामुळे, पुणे दिघी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. 25 मे च्या सलग बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाट मार्गावरील रस्त्याच्या साईड पट्टीवरुन माती सरकत आहे, आणि यामुळेच हा अपघात झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.


प्राथमिक माहितीनुसार, ताम्हिणी घाट आणि शेजारील परिसरात सतत होणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेचा दरड सदृश्य भाग कोसळला, दरम्यान या रस्त्यातून जात असताना टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर घटना घडली. तात्काळ आपत्तकालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्याने, संभाव्य धोका टाळण्यास मदत झाली. विषारी गॅस वातावरणात पसरविण्यापासून थांबविण्यात आले.



हायड्रोक्लोरीक गॅसचे वाहतूक करणाऱ्या टँकरचे नुकसान


या अपघातात हायड्रोक्लोरीक ऍसिड वाहतूक करणाऱ्या टँकर चे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन या मार्गांवरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व नागरिक यांच्या माध्यमातून रस्ता मोकळा करण्याचे काम संध्याकाळी उशीरा पर्यंत सुरु होते. या घटनेमुळे डोंगरप्रवण भागातील रस्तासुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी 3 ते 4 तास कालावधी लागू शकतो त्यामुळे सदर मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहतूकदारानी याची नोंद घ्यावी असे आवाहन माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्याकडुन समाज माध्यमे व प्रसारमाध्यमाद्वारे करण्यात आले होते.

Comments
Add Comment