Marathi film screening at Cannes: मराठमोळा 'ऊत' पोहोचला कान्स चित्रपट महोत्सवात

Marathi film screening at Cannes Festival: सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्‍या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Cannes International Film Festival 2025) नानाविध चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळत असते. ज्यात मराठी चित्रपटांनी देखील बाजी मारली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कान्सच्या भव्य दिव्य स्क्रीनवर काही मराठी चित्रपट झळकले आहेत. ज्यामध्ये वेरा फिल्म्सच्या 'ऊत' या चित्रपटाचा देखील समावेश आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेल्या या मराठी चित्रपटाचे नुकतेच कान्स महोत्सवात स्क्रीनिंग संपन्न झाले.



'उत' ने जिंकली प्रेक्षकांची मने


मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल,श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे. त्यानंतर आता 'कान्स' सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राम मलिक दिग्दर्शित या चित्रपटातून राज मिसाळ आणि आर्या सावे हे युवा कलाकार भेटीला आले आहेत.


कान्स सारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंग आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणे ही आमच्या चित्रपटाच्या टीमसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे चित्रपटाचे मुख्य अभिनेते राज मिसाळ यांनी सांगितले. समाजापर्यंत चांगला दृष्टिकोन पोहोचवण्याचा केलेल्या प्रयत्नाचं हे यश आहे, अशी भावना त्यांनी या स्क्रीनिंग नंतर व्यक्त केली.


'ऊत' चित्रपटातून एक ज्वलंत सामाजिक विषय मांडण्यात आला असून लवकरच हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’

लोकल ट्रेन मधील धक्कादायक अनुभवाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री गिरीजा ओक?

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री गिरीजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन

‘धुरंधर’चा रनटाईम १८५ मिनिटे ? रणवीरच्या कारकिर्दीतील सर्वात लांब चित्रपट

मुंबई : धुरंधरच्या ट्रेलरने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. हा ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी लाँच

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने