Saturday, May 24, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे आणि लवकर निदान व योग्य उपचार महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित करणे आहे.

थायरॉईड ग्रंथी मानेच्या खाली, श्वासोच्छ्वास नलिका आणि अन्ननलिका यांच्याजवळ असलेल्या फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी आहे. ही ग्रंथी थायरॉक्सिन आणि ट्रायओडोथायरोनिन (टी-3 आणि टी-4) यांसारखी आवश्यक संप्रेरके तयार करते, जी शरीरातील अनेक कार्यांवर नियंत्रण ठेवतात. थायरॉईड ही आपल्या घश्यामध्ये स्थित एक लहान ग्रंथी आहे. जी आपल्या शरीरातील पचनक्रिया नियंत्रित करते. जेव्हा ते योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा आपल्याला आरोग्य समस्या उद्भवू शकतात



थायरॉईडची कारणे


थायरॉईड ही एक सामान्य समस्या आहे. जी अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हार्मोनल असंतुलन होय. जेव्हा थायरॉईड ग्रंथी पुरेशी संप्रेरके तयार करत नाही किंवा खूप जास्त तयार करत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. आयोडीनची कमतरता हे देखील थायरॉईडचे एक प्रमुख कारण आहे. कारण थायरॉईड संप्रेरक तयार करण्यासाठी आयोडीन आवश्यक आहे.

आनुवंशिकता देखील एक महत्त्वाचा घटक आहे. जर कुटुंबातील एखाद्याला थायरॉईडची समस्या असेल, तर इतरांनाही धोका असू शकतो. याव्यतिरिक्त, हाशिमोटो आणि ग्रेव्हस रोग यासारख्या स्वयंप्रतिकार विकारांमुळे थायरॉईड समस्या उद्भवू शकतात.जास्त ताणतणाव आणि खराब जीवनशैलीमुळे थायरॉईडच्या समस्याही वाढू शकतात.



लक्षणे:


पुरुषांमध्ये थायरॉईडची सामान्य लक्षणे:

थकवा आणि अशक्तपणा , वजन वाढू शकते,केस गळणे, स्नायू आणि सांधेदुखी,मूड बदल: जसे की चिडचिड, नैराश्य किंवा चिंता. हृदयाचे ठोके बदल समस्या,पचन क्रिया व्यवस्थित न होणे, जसे की बद्धकोष्ठता किंवा अतिसार. लैंगिक समस्या

महिलांमध्ये थायरॉईड समस्यांची लक्षणे

हायपोथायरॉईडीझमची लक्षणे थायरॉईड ग्रंथी पुरेशी हार्मोन्स तयार करत नाही तेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो. सामान्य लक्षणे थकवा,वजन वाढणे कमी होणे, थंड असहिष्णुता,कोरडी त्वचा आणि केस,बद्धकोष्ठता,मासिक पाळीतील अनियमितता.

सल्ला -

पोषक तत्व असलेल्या आहाराचे सेवन करावे. तुम्ही जो आहार घ्याल त्यामध्ये फायबर, प्रोटीन्स आणि मिनरल्सचा समावेश असावा.

दररोज व्यायाम करा. रोज व्यायाम केल्याने थायरॉईडची लक्षणे कमी होऊ शकतात. यामुळे मेटाबॉलिज्म आणि एनर्जी बूस्ट होते. तसेच स्नायूही मजबूत होतात.

ॲक्टिव्ह रहा. दिवसभर व्यस्त रहाल अशा कामांचा रुटीनमध्ये समावेश करा. आरोग्याशी संबंधित समस्यांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी, दिवसभर ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा.

स्ट्रेस घेऊ नका. बिझी लाइफ किंवा इतर कारणांमुळे स्ट्रेस येणे नॉर्मल आहे. मानसिक ताण-तणाव मॅनेज करण्यासाठी रोज मेडिटेशन, योगासने आणि श्वसनाचे व्यायाम करावेच. स्ट्रेस घेतल्यामुळे आपले मेटाबॉलिज्म कमकुवत होते.

पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तासांच्या झोपेने थायरॉईड ग्रंथी हार्मोन्स सोडण्यास आणि त्या रेग्युलेट करण्यास सक्षम असते.दैनंदिन जीवनात वरील प्रमाणे सातत्य ठेवावे आणि आहारात आयोडीन युक्त मिठाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंग तुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी केले आहे

Comments
Add Comment