
मुंबई: आता प्रतीक्षा संपली आहे. भारताला आज नवा कसोटी कर्णधार मिळणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवार २४ मे म्हणजेच आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कसोटी संघाची घोषणा करणार आहे. सगळ्यात मोठी उत्सुकता आहे ती म्हणजे कसोटी कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची. रोहित शर्मानंतर कोणाकडे नेतृत्व सोपवले जाणार हे आज समजणार आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत एक नाव सर्वात पुढे आहे ते म्हणजे शुभमन गिल. २५ वर्षीय शुभमन गिलकडे नेतृत्वाती माळ जाणार का याचे उत्तर काही तासांतच मिळेल.
आज टीम इंडियाची निवड मुंबईच्या बीसीसीआयच्या हेडक्वार्टरमध्ये होईल. त्यानंतक दीड वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली जाईल. येते कर्णधारपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. जसप्रीत बुमराहने खुद्द सांगितले की तो इंग्लंड दौऱ्यावर ३ कसोटी सामने खेळू शकणार आहे. अशातच शुभमन गिलकडे नेतृत्व जाण्याची दाट शक्यता आहे. बुमराहने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५मध्ये दोन कसोटी सामन्यांसह तीन सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते.
भारत वि इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी २० ते २४ जून- हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबेस्टन, बर्मिंगहम
तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - द ओव्हल, लंडन
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संभाव्य संघ
शुभमन गिल(कर्णधार), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, वॉशिंगटन सुंदर, हर्षित राणा, श्रेयस अय्यर, करूण नायर
हे खेळाडूही दावेदार
अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आकाश दीप, अभिमन्यू इश्वरन, अंशुल कम्बोज, अर्शदीप सिंह, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, तनुष कोटियन, नवदीप सैनी, ख़लील अहमद.