
मुंबई :प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विशेषतः उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती मागणी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते राजकोट आणि मुंबई सेंट्रल ते गांधीधाम दरम्यान विशेष भाड्याने अतिजलद तेजस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने विशेष भाड्याने दोन विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे .
ट्रेन क्रमांक ०९००५ मुंबई सेंट्रल -राजकोट स्पेशल दर बुधवार आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ .४५ वाजता राजकोटला पोहोचेल. ही ट्रेन ३० मे ते २७ जून पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे,
ट्रेन क्र. ०९००६ राजकोट-मुंबई सेंट्रल स्पेशल दर गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता राजकोटहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ३१ मे ते २८ जून पर्यंत धावेल.ही गाडी बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर आणि वांकानेर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर कोच असतील.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : भारतातील कापड समुदायाला एकाच छताखाली एकत्र आणणारे 'गार्टेक्स टेक्सप्रोसेस इंडिया ...
ट्रेन क्रमांक ०९०१७ मुंबई सेंट्रल - गांधीधाम स्पेशल ही गाडी दर सोमवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११. २० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५५ वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन ०२ जून ते ३० जूनपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१८ गांधीधाम-मुंबई सेंट्रल स्पेशल दर मंगळवारी गांधीधामहून संध्याकाळी ६. ५५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ०३ जून ते ०१ जुलैपर्यंत धावेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, समख्याली आणि भचाऊ स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर
कोच आहेत.
कालावधी वाढवण्यात आलेल्या विशेष गाड्या: ट्रेन क्रमांक ०९०६७ उधना-जयनगर अनारक्षित विशेष गाडी २९ जून पर्यंत,ट्रेन क्रमांक ०९०६८ जयनगर-उधना अनारक्षित विशेष गाडी ३० जून पर्यंत , ट्रेन क्रमांक ०६०९६ उधना-समस्तीपूर स्पेशल २८ जून पर्यंत आणि ट्रेन क्रमांक ०९०७० समस्तीपूर-उधना स्पेशल ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.