
Shubman Gill-led #TeamIndia are READY for an action-packed Test series
A look at the squad for India Men’s Tour of England 🙌#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/y2cnQoWIpq
— BCCI (@BCCI) May 24, 2025
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अठरा क्रिकेटटूंचा भारतीय संघ जाहीर केला आहे. करुण नायर, शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शन यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. पण मोहम्मद शमीला संघात स्थान मिळालेले नाही.
फेब्रुवारी २०२२ पासून भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहितसोबत, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांनीही कसोटीला निरोप दिला आहे. या पार्श्वभूमीवर निवड समितीने रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर गिलची कर्णधारपदी नियुक्ती करत भारतीय क्रिकेटमधील नव्या युगाची सुरुवात केली आहे.
शुभमन गिल २५ वर्षे आणि २५८ दिवसांचा आहे. तो कसोटीत भारताचे नेतृत्व करणारा पाचवा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. याआधी मन्सूर अली खान पतौडी (२१ वर्षे, ७७ दिवस), सचिन तेंडुलकर (२३ वर्षे, १६९ दिवस), कपिल देव (२४ वर्षे, ४८ दिवस) आणि रवी शास्त्री (२५ वर्षे, २२९ दिवस) यांनी लहान वयात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. मन्सूर अली खान पतौडी हा भारताचा र्वात लहान वयाचा कसोटी कर्णधार आहे. अद्याप त्याचा विक्रम कोणी मोडलेला नाही.
शुभमन गिलने पाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्याने निवडक एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. या व्यतिरिक्त तो गुजरात टायटन्स या आयपीएल संघाचे नेतृत्व करत आहे.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार असलेला भारतीय संघ जाहीर
शुभमन गिल, कर्णधार
रिषभ पंत, उपकर्णधार, यष्टीरक्षक
यशस्वी जयस्वाल
केएल राहुल
साई सुदर्शन
अभिमन्यू ईस्वरन
करुण नायर
नितीश कुमार रेड्डी
रवींद्र जडेजा
ध्रुव जुरेल, यष्टीरक्षक
वॉशिंग्टन सुंदर
शार्दुल ठाकूर
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज
प्रसिध कृष्णा
आकाश दीप
अर्शदीपसिंह
कुलदीप यादव