Saturday, May 24, 2025

महत्वाची बातमीसाप्ताहिकअर्थविश्व

RBI केंद्राला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार

RBI केंद्राला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारला २,६८,५९०.०७ कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. परकीय चलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि सरकारी रोख्यांमध्ये झालेली गुंतवणूक यामुळे रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने २०२३ - २०२४ मध्ये २.१ लाख कोटी रुपये आणि २०२२ - २०२३ मध्ये ८७ हजार ४२० कोटी रुपये लाभांश भारत सरकारला दिला होता.

रिझर्व्ह बँकेमध्ये भारत सरकारची १०० टक्के थेट गुंतवणूक आहे. यामुळे दरवर्षी होणाऱ्या नफ्यातून ठराविक रक्कम लाभांश म्हणून रिझर्व्ह बँक भारत सरकारला हस्तांतरित करते. या रकमेचा वापर सरकारी योजनांसाठी केला जातो. रिझर्व्ह बँक लाभांश दिल्यानंतर उरलेल्या पैशांचा वापर बँकेचे विविध खर्च चालवण्यासाठी करते.

भारत सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ११.२१ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या लाभांशाचा वापर सरकारच्या विविध योजनांमध्ये केला जाईल.
Comments
Add Comment