
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान भारत सरकारने पाकिस्तानची विमाने आणि सैन्य उड्डाणांवर आपल्या हवाई क्षेत्रातील बंदी २३ जून पर्यंत वाढवली आहे. हा निर्णय गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात आला. या हल्ल्यात २६ निर्दोष नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
शुक्रवारी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार नवीन नोटीस जारी करण्यात आली. यानुसार पाकिस्तानच्या कोणत्याही एअरलाईन्सच्या उड्डाणांना भारतीय आकाशा प्रवेश दिला जाणार आहे. यात सैन्याच्या विमानांचाही समावेश आहे.
पाकिस्तानने वाढवली होती बंदी
हे पाऊल अशा वेळेस उचलले जेव्हा दोन दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की पाकिस्ताननेही सर्व भारतीय विमानांना आपल्या एअरस्पेसची बंदी एक महिन्यांनी वाढवली होती.
पाकिस्तानने पहिल्यांदा २३ एप्रिलला भारतीय विमानांसाछी एअरस्पेस बंद केले होते. पहलगाम हल्ल्यानंतरचा तो दिवस होता.
काय सांगतात नियम?
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या नियमानुसार एअरस्पेसवरील बंदी अधिकाधिक एक महिन्यांसाठी लावता येते. त्यानंतर पुन्हा रिन्यू करावी लागते. भारताने पाकिस्तानच्या विमानांना बंदी मेमध्ये जाहीर केली होती. यात पाकिस्तानच्या सर्व विमानांवर बंदी घालण्यात आली होती. भारताने ही बंदी लावत स्पष्टपणे दाखवले होते की जोपर्यंत सीमेवर दहशतवाद बंद होत नाही तोपर्यंत हवाई संपर्कही शक्य नाही.