
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : भारतातील कापड समुदायाला एकाच छताखाली एकत्र आणणारे 'गार्टेक्स टेक्सप्रोसेस इंडिया मुंबई-२०२५ हे प्रदर्शन मुंबई गुरुवारपासून वांद्रे येथील जिओ येथे सुरू झाले आहे. यामध्ये कापड आणि वस्त्र उत्पादन यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान आणि कापड, डिजिटल स्क्रीन प्रिंट, साधनसामग्री आणि ट्रिम्समधील नवकल्पनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भारत, चीन, इटली, जपान, कोरिया, सिंगापूर आणि तैवानसह १२५ हून अधिक प्रदर्शक, या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रभावी सहभागी असून जागतिक वस्त्रोद्योगात भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका अधोरेखित करत आहेत.
प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला संजय सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र सरकार, शशांक चौधरी, आयएएस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इन्व्हेस्ट यूपी, स्टीवन फँग, अध्यक्ष, तैवान सिविंग मशिनरी असोसिएशन, एल्गर स्ट्रॉब, व्यवस्थापकीय संचालक, व्हीडीएमए टेक्सटाइल केअर, फॅब्रिक आणि लेदर टेक्नॉलॉजीज, शरद जयपुरिया, अध्यक्ष, डेनिम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि सीएमडी, गिन्नी इंटरनॅशनल लिमिटेड, सायमन ली यांची उपस्थिती होती.

उपनगरातील विकासकामांचे प्रस्ताव सादर, शहरातील प्रस्ताव प्रतीक्षेत मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने सध्या प्रशासक नियुक्त ...
'इन्व्हेस्ट यूपी'चे अतिरिक्त सीईओ शशांक चौधरी (आयएएस) यांनी माहिती दिली, की 'पीएम मित्र योजनेअंतर्गत, आम्ही लखनौजवळ एक मेगा-इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क विकसित करत आहोत, ज्यामध्ये १,००० एकर जमीन व्यापली जाणार आहे. हे पार्क 'सार्वजनिक खासगी भागीदारी' तत्त्वाअंतर्गत स्थापित केले जाईल, ज्यामध्ये गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी मिळणार आहेत. विविध प्रकारच्या परवानग्यांसाठी उत्तर प्रदेश सरकार ' सिंगल विंडो क्लिअरन्स योजना’ आणि मंजुरीसाठी नवीन संकेतस्थळ विकसित करत आहे.