
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला विधानसभेतील चुनाभट्टी येथे सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली.पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले सफाईचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी महापालिकेला दिले.

Mumbai Local Train : मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी, उद्या रेल्वेचा ब्लॉक, कोणती रेल्वे वाहतूक मंदावणार? जाणून घ्या
मुंबई : पावसाळा आता दणक्यात सुरु झाला असून मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या रेल्वेचे काम सुरळीत ठेवण्यासाठी उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. दररोज लाखो ...
याप्रसंगी माजी खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, आमदार तुकाराम काते व बृहन्मुंबई महापालिकेचे उप आयुक्त अभिजीत बांगर आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले की पावसाळा सुरू होण्याच्या मार्गांवर असून नाले साफसफाई वेळेत आणि योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि उपनगरातील नाले सफाईच्या कामांकडे लक्ष दिले आहे.