
बनासकांठा: ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान भारताकडून मोठ्या प्रमाणात पराभव पत्करल्यानंतरही पाकिस्तानातून घुसखोरीचे प्रयत्न आजही सुरू आहेत. ताज्या घडामोडीत, गुजरातमधील बनासकांठा येथे शुक्रवारी रात्री एका पाकिस्तानी घुसखोराने (Pakistani intruder) भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु सीमेलगत तैनात असलेल्या बीएसएफ (BSF) च्या जवानांनी त्याला ठार केले.
घुसखोराने BSF च्या इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष
या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना, बीएसएफने आज, शनिवारी सांगितले की, बीएसएफ जवान गस्तीवर असताना एका संशयास्पद व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कुंपणाकडे येताना दिसला. जवानांनी घुसखोराला थांबण्याचा इशारा दिला पण तो पुढे येतच राहिला. त्यामुळे जवानांनी गोळीबार करत त्याला ठार केले.
BSF troops neutralised a Pakistani intruder attempting to enter Indian territory in Banaskantha district, Gujarat, on May 23 during night. BSF troops spotted one suspicious person advancing towards the border fence after crossing the International Border. They challenged the… pic.twitter.com/qQu8pXsaZj
— ANI (@ANI) May 24, 2025
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, बीएसएफने पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला योग्य उत्तर देऊन देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. या कारवाईदरम्यान, सीमेवर तैनात असलेले सैनिक पायी, वाहनाने आणि उंटावरून गस्त घालून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर कडक नजर ठेवत आहेत.