नांडेद : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने नियोजन सुरू केले आहे. राजकीय पक्षांनाही निवडणुकांसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना उठा आणि निवडणुकीसाठी सज्ज व्हा असा संदेश दिला आहे. भाजपाने सोमवारी नांदेडमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित असतील. नांदेडच्या सभेतून भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद करणार आहे.
अमित शाह रविवार २५ मे, सोमवार २६ मे आणि मंगळवार २७ मे असे तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. याआधी ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने नांदेडमध्ये आले होते. विधानसभेच्या प्रचारानंतर पहिल्यांदाच अमित शाह नांदेडमध्ये पहिल्यांदाच येत आहेत.
राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे आणि महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाट्न होणार आहे. या उदघाट्नला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असणार आहे. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत नवीन मोंढा मैदानावर भाजपची जाहीर सभा पार पडणार आहे.