Friday, May 23, 2025

विडिओ

कोमट पाणी पिण्याचे अफलातून फायदे

कोमट पाणी पिण्याचे अफलातून फायदे

पाण्याला जीवन असं म्हटलं जातं.. निरोगी आयुष्य जगण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं. पुरेसं पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करणं आरोग्यदायी मानलं जातं. त्यात गरम किंवा कोमट पाणी रोज सकाळी उठल्यावर पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. काही दिवसात पावसाला सुरू होतोय. त्यामुळं गरम पाणी प्यायल्यानं कोणते फायदे होऊ शकतात ते आपण पाहूया...


शरीराचं चयापचय आणि आरोग्य नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज सुमारे आठ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, अशा लोकांनी गरम पाण्याचं सेवन केलं, तर तुमची पचनशक्ती मजबूत होईल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही.


कोमट पाणी प्यायल्यास काही प्रमाणांत चोंदलेल्या नाकाला आराम मिळतो आणि बंद नाकाची तक्रारही दूर होते.


कोमट पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.. गरम पाणी प्यायल्यानं त्वचा शरीराच्या आतून हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते. गरम पाण्यानं पचनक्रिया सुधारते आणि पोटातील गॅसची समस्या कमी होते.


सकाळी सकाळी तुम्ही गरम पाणी प्यायल्यास पचनक्रिया लगेचच सुरू होते आणि शरीरातील विषद्रव्य पदार्थही निघून जाण्यास मदत होते.

Comments
Add Comment