
कुटुंबाला सुरक्षा राहावी यासाठी बहुतांश मंडळी टर्म प्लॅनची निवड करतात. या टर्म पॉलिसीमुळं पॉलिसीधारकाच्या आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. दाव्यानुसार पैसे मिळाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान होते. विमाधारकांचा अपघात, आजारपण, दुर्घटना या कारणांमुळं मृत्यू होऊ शकतो. मात्र, सर्वच मृत्यू प्रकरणाला विमा कवच असतेच असे नाही. विमा उतरवला की चिंता मिटली. प्रत्येक गोष्टीचा दावा अर्थात क्लेम मिळणार असं तुम्हाला वाटू शकत. पण तसं नाही. कोणत्या कोणत्या स्थितीमध्ये तुम्हाला दावा मिळणार नाही. याबाबतची माहिती या लेखातून जाऊन घेऊया...
धोकादायक साहस करणं
पॉलिसीधारकाचा धोकादायक साहस करताना मृत्यू झाल्यास विमा कंपनी टर्म प्लॅन नाकारू शकते. आयुष्याला जोखमीत टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टी यात येऊ शकतात. यात अॅडव्हेंचर स्पोर्टस्, मोटार रेस, स्काय डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग, बंजी जंपिंग, मौत का कुआँ इत्यादी.

डोळ्यात तेल घालून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील वीर जवान संदीप पांडुरंग गायकरला गुरुवारी वीर मरण आले. ...
व्यसनामुळे मृत्यू
पॉलिसीधारक हा दारू पिऊन गाडी चालवत असेल किंवा अमली पदार्थ घेतले असेल आणि अपघातात त्याचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी टर्म प्लॅनची रक्कम देण्यास मनाई करू शकते.
एचआयव्ही
विमा कंपनी अशा प्रकरणात विमा कवच देणार नाही. जर एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यू हा सेक्शुअल ट्रान्समिटेडच्या आजारपणामुळे होत असेल म्हणजेच एचआयव्ही/एड्सने होत असेल तर विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही.
हत्या
जर एखाद्या पॉलिसीधारकाची हत्या झाली आणि त्यात वारसाचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास किंवा त्याच्यावर हत्येचा आरोप असेल तर विमा कंपनी टर्म प्लॅनचा दावा मंजूर करत नाही. अशावेळी क्लेम रिक्वेस्ट पेंडिंग ठेवली जाते. जोपर्यंत नॉमिनीला क्लीन चिट मिळत नाही किंवा तो निर्दोष असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत पॉलिसीची रक्कम दिली जात नाही. याशिवाय पॉलिसीधारक एखाद्या गुन्ह्यात अडकला असेल आणि त्याची हत्या झाली असेल तर विम्याची रक्कम मिळत नाही.