Friday, May 23, 2025

ताज्या घडामोडीश्रध्दा-संस्कृती

Vastu Tips: घराच्या या दिशेला ठेवा तिजोरीची चावी, वायफळ खर्च होणार नाही

Vastu Tips: घराच्या या दिशेला ठेवा तिजोरीची चावी, वायफळ खर्च होणार नाही

मुंबई: वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्ट ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे. याचे पालन केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही गाडीची आणि घराची चावी कुठेही ठेवत असाल तर असे करणे चुकीचे आहे. यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया या चावी कोणत्या दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.


वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या चाव्या सकारात्मक अथवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. घराची अथवा गाडीची चावी कधीही ड्रॉईंग रूमध्ये ठेवू नका. यामुळे तुमच्या विकासात अडथळा निर्माण होऊ शकतो.


घरात पूजाघरचे स्थान अतिशय पवित्र असते त्यामुळे पुजाघरात कधीही चावी ठेवू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. तसेच जीवनात समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.


घराच्या किचनचा संबंध आपल्या आरोग्याशी असतो. याला घराचे हृदय म्हटले जाते. याचा संबंध प्रगतीशी आहे. यामुळे किचनमध्येही चाव्या ठेवू नयेत.


चावी नेहमी घराच्या लॉबीच्या पश्चिम दिशेला ठेवली पाहिजे. याशिवाय चावी ठेवण्यासाठीचा स्टँड नेहमी उत्तर अथवा पूर्व दिशेला असावा. यामुळे तुम्हाला नक्कीच चमत्कारिक परिणाम पाहायला मिळतील.


तसेच डायनिंग टेबल, खुर्ची अथवा मुलांच्या रूमध्ये चावी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते. याशिवाय घरात कधीही जुन्या चाव्या तसेच गंजलेल्या चाव्या ठेवू नयेत.


तिजोरीच्या चाव्यांबाबत बोलायचे झाल्यास त्याला दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. येथे तिजोरीची चावी ठेवल्याने वायफळ खर्चावर नियंत्रण येते.

Comments
Add Comment