Friday, May 23, 2025

महाराष्ट्रठाणे

शिरढोण, खोणी येथील सदनिकांच्या किमतीत कपात

शिरढोण, खोणी येथील सदनिकांच्या किमतीत कपात

मुंबई: कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) सन २०२४ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर काढण्यात आलेल्या सोडतीतील मौजे शिरढोण (ता.कल्याण, जि.ठाणे) व मौजे खोणी (ता.कल्याण, जि.ठाणे) येथील ०६ हजार २४८ सदनिकांची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.



महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मौजे शिरढोण येथील सदनिकांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावास मान्यता दिली असून सदर मान्यतेनुसार कोकण मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील ठाणे जिल्ह्यातील मौजे शिरढोण येथील अत्यल्प उत्पन्न गटातील ५२३६ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका ०१ लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कमी करण्यात आली असून सदर सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख २८ हजार ७४२ रुपये आकरण्यात येणार आहे, असे गायकर यांनी सांगितले.

तसेच मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील मौजे खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील अत्यल्प उत्पन्न गटातील १०१२ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका ०१ लाख ०१ हजार ८०० रुपयांनी कमी करण्यात आली असून सदर सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख ११ हजार ७०० रुपये असणार आहे.


Comments
Add Comment