
आरोपींनी १९ मे रोजी थार ऐवजी बोलेरो वापरण्याचा निर्णय घेतला. दोघे पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पळून गेले. सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये त्यांनी मुक्काम केला. सेगावहून ते पसरणी मार्गे कोगनळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये जाऊन २० मे रोजी थांबले होते. प्रीतम पाटील यांच्या शेतावर त्यांनी २१ मे रोजी मुक्काम केला. पुन्हा २२ मे रोजी ते पुण्यात पोहोचले.
पोलिसांना सतत हुलकवणी देत असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील निवांतपणे हॉटेलमध्ये मटण पार्टी झोडत होते. पोलिसांना आरोपी मटण खात असतानाचे एक सीसीटीव्ही फूटेज मिळाले. या फूटेजच्या मदतीने चौकशी करत पोलीस आरोपींचा माग काढू लागले. अखेर दोन्ही आरोपींना पुण्यातल्या स्वारगेट परिसरातून मध्यरात्री पकडण्यात आले. आरोपींना मध्यरात्री झोपेतून उठवून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे.