PM Modi : पंतप्रधान मोदींची कर्तव्यपूर्ती अन् जनतेची स्वप्नपूर्ती!

अमृत भारत स्थानकं जनतेच्या सेवेत


कितीही टीका झाली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचा कर्तव्यपथ सोडलेला नाही. लोकाभिमुख विकासकामांवर त्यांनी मोठा भर दिलाय. विकसित भारत या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पंतप्रधान मोदींनी एक एक पाऊल पुढं टाकलंय. देशातील अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण करतानाच त्यांनी भारताचं उद्दिष्ट काय असेल यांचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

एकीकडे भारत - पाकिस्तान युद्धविरामावर चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे लोकाभिमुख विकासकामांचं लोकार्पण करण्यात येतंय. या सर्वांचं श्रेय जातयं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत विकसित केलेल्या देशातील अनेक रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन झालंय. बिकानेर - मुंबई एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. इतकंच नव्हे तर जवळपास २६ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलंय. पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती केलीय. यात रेल्वेसेवेचा विस्तार महत्त्वाचा होता. पंतप्रधान मोदींनी देशातील १८ राज्यं, केंद्रशासित प्रदेशातील ८६ जिल्ह्यांतील १०३ पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं उद्धाटन केलंय. या रेल्वे स्थानकांसाठी १,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झालाय. तर अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत १,३०० पेक्षा जास्त स्थानकांचा आधुनिक सेवा सुविधांसह पुनर्विकास केला जातोय.


रेल्वे स्थानकांच्या उभारणीत प्रादेशिक वास्तुकलेचं प्रतिबिंब दिसतंय.


आता पाहूयात अमृत रेल्वे स्थानकांची वैशिष्ट्ये


राजस्थानमध्ये देशनोक रेल्वेस्थानकावर करणी माता मंदिराची वास्तुकला प्रतिबिंबित आहे.
तेलंगणामध्ये बेगमपेट रेल्वेस्थानकावर काकतीय साम्राज्य वास्तुकला प्रतिबिंबित आहे.
बिहारमध्ये थावे रेल्वेस्थानकावर माता थावेवाली यांची वास्तुकला प्रतिबिंबित आहे.
गुजरातमध्ये डाकोर रेल्वेस्थानकावर रणछोडरायजी महाराज यांची वास्तुकला प्रतिबिंबित आहे.

या सर्व रेल्वे स्थानकांचा विकास करतानाच भारताचं व्हिजन काय आहे, हेही दिसून येतंय. सर्वसामान्यांसाठी सुविधा आणि प्रवासाचा समृद्ध अनुभव घेता येईल अशा प्रकारच्या शाश्वत पद्धतींचं अनोखं एकात्मतीकरण पंतप्रधान मोदींनी घडवून आणलंय.


१०० विद्युतीकरण झालेली रेल्वे स्थानकं कोणती आहेत ते पाहूया... 


सूरतगड-फलोदी, ३३६ किमी

फुलेरा-डेगाना, १०९ किमी

उदयपूर-हिम्मतनगर, २१० किमी

फलोदी-जैसलमेर, १५७ किमी

समदारी-बाडमेर, १२९ किमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन भुयारी मार्ग, राष्ट्रीय महामार्गांचं रुंदीकरण, राजस्थानातील ७ रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण केलंय. तसंच त्यांनी सुमारे ४,८५० कोटी रुपयांहून अधिक रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केलीय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध सौर्जऊर्जा आणि ऊर्जा प्रकल्पांची पायाभरणी, विविध आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा योजनांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन झालंय. मोदी हैं तो मुमकिन हैं असं म्हटलं जातं. दहशतवादाचा बीमोड करतानाच देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विकासपुरुष म्हणून पाहिलं जातं, त्याला हिच कारणं आहेत.
Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या