
अमृत भारत स्थानकं जनतेच्या सेवेत
कितीही टीका झाली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचा कर्तव्यपथ सोडलेला नाही. लोकाभिमुख विकासकामांवर त्यांनी मोठा भर दिलाय. विकसित भारत या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पंतप्रधान मोदींनी एक एक पाऊल पुढं टाकलंय. देशातील अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण करतानाच त्यांनी भारताचं उद्दिष्ट काय असेल यांचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एकीकडे भारत - पाकिस्तान युद्धविरामावर चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे लोकाभिमुख विकासकामांचं लोकार्पण करण्यात येतंय. या सर्वांचं श्रेय जातयं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत विकसित केलेल्या देशातील अनेक रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन झालंय. बिकानेर - मुंबई एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. इतकंच नव्हे तर जवळपास २६ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलंय. पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती केलीय. यात रेल्वेसेवेचा विस्तार महत्त्वाचा होता. पंतप्रधान मोदींनी देशातील १८ राज्यं, केंद्रशासित प्रदेशातील ८६ जिल्ह्यांतील १०३ पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं उद्धाटन केलंय. या रेल्वे स्थानकांसाठी १,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झालाय. तर अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत १,३०० पेक्षा जास्त स्थानकांचा आधुनिक सेवा सुविधांसह पुनर्विकास केला जातोय.
रेल्वे स्थानकांच्या उभारणीत प्रादेशिक वास्तुकलेचं प्रतिबिंब दिसतंय.
आता पाहूयात अमृत रेल्वे स्थानकांची वैशिष्ट्ये
राजस्थानमध्ये देशनोक रेल्वेस्थानकावर करणी माता मंदिराची वास्तुकला प्रतिबिंबित आहे. तेलंगणामध्ये बेगमपेट रेल्वेस्थानकावर काकतीय साम्राज्य वास्तुकला प्रतिबिंबित आहे. बिहारमध्ये थावे रेल्वेस्थानकावर माता थावेवाली यांची वास्तुकला प्रतिबिंबित आहे. गुजरातमध्ये डाकोर रेल्वेस्थानकावर रणछोडरायजी महाराज यांची वास्तुकला प्रतिबिंबित आहे. या सर्व रेल्वे स्थानकांचा विकास करतानाच भारताचं व्हिजन काय आहे, हेही दिसून येतंय. सर्वसामान्यांसाठी सुविधा आणि प्रवासाचा समृद्ध अनुभव घेता येईल अशा प्रकारच्या शाश्वत पद्धतींचं अनोखं एकात्मतीकरण पंतप्रधान मोदींनी घडवून आणलंय.
सिंदूर पुसण्यासाठी आलेल्यांना मातीत गाडले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला पुन्हा इशारा
बिकानेर : जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते; त्यांना मातीत गाडण्यात आले. ज्यांनी हिंदुस्तानचे रक्त सांडले; आज त्यांचा हिशोब चुकता झाला. भारत गप्प राहील ...