
इचलकरंजी : पाकव्याप्त काश्मीरपेक्षा अलीकडे पाकव्याप्त काँग्रेसचा धोका नव्याने तयार झाला आहे. या काँग्रेसवाल्यांची सगळी मानसिकताही पाकिस्तानी लोकांनी हायजॅक केली आहे. जे प्रश्न पाकिस्तानी विचारायला पाहिजेत, ते प्रश्न राहुल गांधी आणि त्यांचे चेले विचारत सुटले आहेत. त्यांच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस घुसला आहे. त्यामुळे त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली.
इचलकरंजीतील विकास पर्व सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, भारत देशाची ताकद जगाने पाहिली आहे. २३ मिनिटांत पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त केले. असे असताना ‘राहुल विचारतो, ड्रोन किती होते? कोणी पाडले? कसे पाडले, अशा मूर्खांना कोण सांगणार? शेतीचे औषध फवारणीचे ड्रोन वेगळे आणि युद्धाचे ड्रोन वेगळे असतात, असे म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली.
विकास पर्व सभेस उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आदी उपस्थित होते.