
नवी दिल्ली: दहशतवादाविरुद्ध लाँच केलेल्या भारताच्या सिंदूर ऑपरेशनला जर्मनीने पाठिंबा दिला आहे. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांनी सांगितले की दहशतवादाविरुद्ध भारताला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासोबतच त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
ते म्हणाले, आम्ही २२ एप्रिलला भारतावर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने स्तब्ध झालोत. नागरिकांवर झालेल्या या हल्ल्याची आम्ही निंदा करतो. आमच्या संवेदना पीडितांसोबत आहेत. भारताला निश्चितच दहशतवादाविरुद्ध स्वत:चा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
काय म्हणाले एस जयशंकर?
मी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या भारताच्या प्रतिक्रियेनंतर लगेचच बर्लिनला आलो आहे. भारत दहशतवाद कधीच सहन करणार नाही. भारत कधीही अण्वस्त्र धमकीला बधणार नाही आणि भारत पाकिस्तानसोबत पूर्णपणे द्विपक्षीय पद्धतीने व्यवहार करेल. या संबंधात कोणत्याही प्रकारचा भ्रम नसला पाहिजे. आम्ही जर्मनीच्या भूमिकेलाही महत्त्व देतो. प्रत्येक देशाला दहशतवादाविरुद्ध स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.