इगतपुरी तालुक्यात रस्त्यांची अवस्था केविलवाणी

  18

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात रस्त्यांची अवस्था खूपच केविलवाणी झाली आहे. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर जणू पाण्याचे तळेच निर्माण झालेले आहे. काही रस्ते चिखलमय झाल्याने छोटे मोठ्या अपघातांचे सत्र सुरू आहे. येथील रस्त्याची अवस्था पाहता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वाहनधारकाना पडला आहे. रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी गुळणी धरून बसलेले आहेत.


इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ते गोंदे दुमाला दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. पावसाने अधिकच रस्ता खराब झाल्याने वाहनधारकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे.


या रस्त्यावर अनेक वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते. सदर रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने वाहने सतत नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकानी केली आहे. या रस्त्याने अनेक कंपनी कामगार गोंदे दुमाला येथे जात असतात. खराब रस्त्यामुळे छोटे मोठे अपघात देखील वाढले आहेत. अनेक जणांना मणक्याचे आजार जडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे पडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून असून अधिकारी मात्र दुर्लक्ष करताना दिसतात.

Comments
Add Comment

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण