Friday, May 23, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

गडचिरोलीत चार नक्षलवादी ठार

गडचिरोलीत चार नक्षलवादी ठार
गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील कवंडे पोलीस मदत केंद्रापासून जवळ असलेल्या जंगलात चकमक झाली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिला नक्षलवादी आहेत.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाचे ३०० जवान आणि केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी गुरुवारी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदी परिसरात रवाना Penr होती. या सुरक्षा पथकाशी नक्षलवाद्यांची चकमक झाली. चकमकीत दोन पुरुष आणि दोन महिला असे एकूण चार नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकाने घटनास्थळावरुन एक स्वयंचलित रायफल, एक ३०३ रायफल, एक भरमार बंदूक, वॉकीटॉकी आणि इतर साहित्य जप्त केले. याआधी २१ मे रोजी सुरक्षा पथकाने नक्षलवाद्यांचा नेता नंबाला केशव राव उर्फ गगन्ना याच्यासह २७ नक्षलवाद्यांना ठार केले होते.

मागील तीन दिवसांपासून कवंडे आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसात गडचिरोलीचत सुरक्षा पथकांनी नक्षलवाद्यांना दणका दिला. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये करेगुट्टा येथे सुरक्षा पथकाने ३१ नक्षलवाद्यांना ठार केले होते. नंतर अबुझमाडमध्ये नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च नेता बसवराजू याच्यासह २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. छत्तीसगडमध्ये अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. सुरक्षा पथकांना मिळत असलेल्या यशामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे.
Comments
Add Comment