Thursday, May 22, 2025

नाशिक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळांकडून त्र्यंबकवासीयांच्या अपेक्षा

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळांकडून त्र्यंबकवासीयांच्या अपेक्षा

त्र्यंबकेश्वर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळांकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सरकारने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ना छगन भुजबळ यांना द्यावे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काही नगरवासीयांकडून होऊ
लागली आहे.राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना मंत्री पद बहाल करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.भुजबळ यांच्या निवडीचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भुजबळ यांच्या निवडीमुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये असलेली मरगळ आता झटकली जाईल असे दिसू लागले आहे.


२०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने मंत्री भुजबळ यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्ते विकास साधला. त्यातल्या त्यात चौपदरीकरण केले.नाशिक - त्र्यंबक रस्त्याचे चौपदरीकरण हे अलीकडे पाच दशकातील सर्वात मोठे विकासाचे उदाहरण या भागासाठी मानले जाते. त्यामुळे अजूनही काही विकासाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी भुजबळ यांना संधी देण्यात यावी अशी अपेक्षा वाढत आहे.


अलीकडेच २१ एप्रिल रोजी छगन भुजबळ यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनाचा लाभ घेतला. मंदिर गर्भगृा हाच्या पायरीवर डोके टेकवत भुजबळ महादेवाला शरण गेले. थोडय्ाच कालावधीत देवाने त्यांची प्रार्थना ऐकली असे बोलले जात आहे.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले उपस्थित होते. तत्पूर्वी दिलेल्या भेटीत युवा कार्यकर्ते हिमांशु देवरे तसेच सहकारी उपस्थित होते.


राष्ट्रवादीचे तालुक्याचे वरिष्ठ पदाधिकारी बहिरुशेठ मुळाणे, वेदांग फडके , गोकुळ बत्तासे यांनी मंत्री भुजबळ यांच्या निवडीचे स्वागत केले. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करणारे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांची कार्यपद्धती आहे.

Comments
Add Comment