Saturday, October 25, 2025
Happy Diwali

शिल्पा शिरोडकरनंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला झाला कोरोना, सर्व कामं ताबडतोब केले बंद

शिल्पा शिरोडकरनंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला झाला कोरोना, सर्व कामं ताबडतोब केले बंद

मुंबई: कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, मुंबईत देखील कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. या महिन्यात आतापर्यंत 95 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले असून, अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. अलीकडेच अभिनेत्री शिल्पा शिरेडकरने कोरोना झाल्याचे सांगितले, त्यानंतर आता आणखीन एका  प्रसिद्ध आभिनेत्रीला आणि तिच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे.

'ज्वेल थीफ' फेम अभिनेत्रीला कोरोनाची लागण

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) नंतर बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री निकिता दत्ता (Nikita Dutta) आणि तिच्या आईला देखील कोरोनाचे निदान झाले आहे. स्वतः निकिताने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याबद्दल माहिती दिली आहे. सध्या निकिता घरात क्वारेंटाईन असून तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. याची माहिती मिळताच तिने तिचे सर्व काम थांबवले असल्याचे देखील सांगितले.

निकिता दत्ताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, "कोविडने मला आणि माझ्या आईला हॅलो म्हटले आहे. आशा आहे की हा नको असलेला पाहुणा जास्त काळ राहणार नाही. या छोट्या क्वारंटाइननंतर भेटू. सर्वांनी आपली काळजी घ्या. निकिता अलीकडेच "ज्वेल थीफ" या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

अलिकडेच बिग बॉस १७ फेम शिल्पा शिरोडकर हिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. याची माहिती तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली होती. तिने लिहिले होते, "मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. सर्वांनी मास्क घाला आणि सुरक्षित रहा."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा