
१५ टक्के पाणीकपात जाहीर
मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत पाणीपुरवठा करणाऱ्या पांनरापूर येथील उर्दचन केंद्रागीरा टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हसेल) कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम बुधवार २८ मे २०५२५ रोजी सकाळी ९.४५ पासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण १२ तासांसाठी नियोजित आहे.
त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार असून या १२ तासांच्या कालावधीत शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच ठाणे व भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांतही ही १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. त्यामुळे या संबंधित परिसरांमधील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाण्याचा चापर काटकसरीने करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
शहर भागांत याठिकाणी असेल पाणीकपात
एफ दक्षिण विभाग (परळ, शिवडी, लालबाग, काळाचौकी)
एफ उत्तर विभाग (वडाळा, माटुंगा, शीव, अॅटॉप हिल)
पूर्व उपनगरातील या भागांत असेल पाणीकपात
टी विभाग मुलुङ (पूर्व) आणि (पश्चिम) भाग
एस विभाग भांडुप, नाहूर, काजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) भाग
एन विभाग विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर आदी भाग
एल विभाग कुर्ला (पूर्व) आणि टिळकनगर चुनाभट्टी भाग
एम पूर्व विभाग (गोवंडी, देवनार, शिवाजी नगर) पूर्ण विभाग
एम पश्चिम विभाग: चेंबूर आणि आसपासचा भाग