Thursday, May 22, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Vaishnavi Hagawane : राजेंद्र हगवणेंची अजितदादांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी!

Vaishnavi Hagawane : राजेंद्र हगवणेंची अजितदादांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी!

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी राजकीय कारवाई झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, या मागणीनं जोर धरला होता. दरम्यान, पक्षाने निर्णय घेत त्यांची हकालपट्टी केली आहे. याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात सुरज चव्हाण यांनी माहिती देताना सांगितलं की, 'अजित पवारांचं पुणे सीपींसोबत बोलणं झालंय. त्यांनी दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल', असं ते म्हणाले.



सुरज चव्हाण हगवणे यांच्या बडतर्फच्या कारवाईवर म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हगवणे यांचा कोणताही संबंध नाही, त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलेलं आहे. अजित पवारांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांना अनेकवेळा संबोधित करताना कुणीही चुकीचं वागला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, टायरमध्ये घालून मारलं जाईल, अशा पद्धतीच्या सुचना दिल्या होत्या. आज अजित पवारांनी पुणे सीपींशी बोलून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.


सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू, नणंद या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, सासरा आणि दीर फरार असल्याची माहिती आहे. सासरा आणि दीराला शोधण्यासाठी तपासासाठी पोलिसांच्या ४ पथके रवाना करण्यात आले आहे. तसेच आज, गुरुवारी (दि. २२) राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बडतर्फ करण्यात आले आहे.

Comments
Add Comment