
बिकानेर : जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते; त्यांना मातीत गाडण्यात आले. ज्यांनी हिंदुस्तानचे रक्त सांडले; आज त्यांचा हिशोब चुकता झाला. भारत गप्प राहील अस ज्यांना वाटत होते ते आज त्यांच्या घरात लपून बसले आहेत. ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा गर्व होता ते आज त्याच्याच ढिगाऱ्यात गाडले गेले आहेत’, असा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.
पंतप्रधान मोदी गुरुवारी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी देशनोके येथे एका जाहीर सभेला संबोधित केले.‘ऑपरेशन सिंदूर'वर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.२२) पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. आता भारताची भूमिका स्पष्ट आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत पाकिस्तानचे सैन्य, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागेल,’ असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तान एक गोष्ट विसरला आहे की आता भारतमातेचा सेवक मोदी येथे ताठ मानेने उभा आहे. मोदींचे चित्त शांत आहे, ते शांतच राहते, पण मोदींचे रक्त सळसळते आहे. आता मोदींच्या धमन्यांमध्ये रक्त नाही, तर लखलखता सिंदूर वाहत आहे. आता पाकिस्तानसोबत कसलाही व्यापार आणि चर्चा होणार नाही. आता केवळ पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा होईल. दहशतवाद नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरने तीन सूत्रे निश्चित केली आहेत. पहिले- जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. त्यासाठी वेळ आपले सैन्य निश्चित करेल. दुसरे सूत्र म्हणजे, भारत अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरणार नाही. तिसरे - आम्ही दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवादाला आश्रय देणारे सरकार यांना वेगळे समजणार नाही. आम्ही ते एकच आहेत असे मानू. पाकिस्तानचा स्टेट आणि नॉन- स्टेट ॲक्टरवाला खेळ आता चालणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी सुनावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले पुणे : वैशाली हगवणे प्रकरणात आपली उगाच बदनामी केली जात आहे. कुणाच्या लग्नाला जाणे ही माझी चूक आहे का? उगाच बदनामी करताय. ...
दहशतवादाला चिरडून टाकण्याची हीच नीती आहे, हीच पद्धत आहे. हा भारत आहे, नवा भारत आहे. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना खतपाणी घालणे सुरू ठेवले तर त्याला हक्काचे पाणी मिळणार नाही. भारतीयांच्या रक्ताशी खेळणे, आता पाकिस्तानला खूप महागात पडेल, असेही ते म्हणाले.
मोदी का दिमाग थंडा है, लेकीन लहू गरम है
अॅटम बॉम्बच्या धमकीने भारत घाबरणार नाही, आता वार केला तर आम्ही खपवून घेणार नाही. वेळ आणि जागा आमचे जवान ठरवतील. सध्या, जगातील बहुतांश देशात पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी आपण विश्वात फिरत आहोत. सर्व पक्षातील नेते या शिष्टमंडळात आहेत. आता, पाकिस्तानचा खरा चेहरा देशाला दाखवू, पाकिस्तान कधीही आपल्याशी सरळ लढूच शकत नाही, म्हणून दहशतवाद्यांना त्यांनी एक हत्यार बनवले आहे. मोदी का दिमाग थंडा होता है, लेकिन लहू गरम है. मोदी के शरीर में लहू नही गरम सिंदूर बेहेता हैं. पाकिस्तान की सेना और अर्थव्यवस्था ये किंमत चुकाएगी, जे हत्यारांवर गर्व करायचे ते आज मृत्यूच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत, हा शोध प्रतिशोध नाही तर न्यायाचे नवे स्वरूप आहे. हा आक्रोश नाही तर समर्थ भारताचे रौद्र रुप आहे, नव्या भारताचे स्वरूप आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर घणाघात केला.