Thursday, May 22, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

तामिळनाडू : तामिळनाडूत बस-टेम्पोची आमने सामने धडक! ५ जणांचा मृत्यू

तामिळनाडू : तामिळनाडूत बस-टेम्पोची आमने सामने धडक! ५ जणांचा मृत्यू

तंजावर : तामिळनाडूमध्ये तंजावर-तिरुचिरापल्ली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. सेंगकीपट्टी पुलाजवळ सरकारी बस आणि खासगी टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला.





तंजावरच्या जिल्हाधिकारी प्रियंका बालसुब्रमण्यम यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

Comments
Add Comment