Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

वॉशिंग्टनमध्ये गोळीबार, इस्रायलच्या दूतावासातील दोघे ठार

वॉशिंग्टनमध्ये गोळीबार, इस्रायलच्या दूतावासातील दोघे ठार
वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेच्या राजधानीचे शहर असलेल्या वॉशिंग्टन डी. सी. येथील ज्यू संग्रहालयाजवळ झालेल्या गोळीबारात इस्रायलच्या दूतावासातील दोन कर्मचारी ठार झाले. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी ही माहिती दिली. मेट्रोपोलिटन पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. गोळीबारात एक पुरुष आणि एक महिला अशा दोन जणांचा मृत्यू झाल्याचे मेट्रोपोलिटन पोलिसांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोळीबाराच्या घटनेचा निषेध केला. ट्रम्प यांनी 'ट्रूथ सोशल'वर पोस्ट करुन गोळीबाराचा निषेध केला. 'वॉशिंग्टन डी. सी. येथील हत्याकांड हे भयानक आहे. यहुदी विरोधी भावनेतून गोळीबार झाला आहे. हे प्रकार आता थांबलेच पाहिजे. अमेरिकेत द्वेष आणि कट्टरतेला स्थान नाही. पीडितांच्या कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. देव त्यांना हे दुःख सहन करण्याची देवो. ' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी 'ट्रूथ सोशल'वर पोस्ट करुन दिली. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेतील गोळीबाराची घटना धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच इस्रायलच्या जगभरातील सर्व दूतावासांच्या संरक्षणात वाढ करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
Comments
Add Comment