
आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
सिंधुदुर्ग : उत्तर कर्नाटक-गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने "ऑरेंज अलर्ट" जारी केला आहे. जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तरीही प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
पावसाचा जोर कायम
जिल्ह्यात मंगळवार पासून सुरु झालेला वादळी पावसाचा जोर आजही कायम आहे बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५६.७० मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाउस वेंगुर्ले तालुक्यात ८० मिमी पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी घर-गोठे यांची पडझड होऊन बुधवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार एकूण ५ लाख ७१ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाल्याही माहिती आपत्ती विभागातून देण्यात आली. बुधवारी दोडामार्ग तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. दरम्यान समुद्र खवळला असल्यान अनेक नौका सुरक्षेसाठी देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत. या पावसामुळे महावितरणाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तो सुरु करण्यासाठी महावित्रांचे काम्राचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे क्काही काल वाहतूक ठप्प झाली होती. पण नंतर हि दरड बाजूला करण्यात आली. आता वाहतूक सुरुव्लीत सुरु आहे.