Thursday, May 22, 2025

महामुंबई

३५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय

बसून काम करणाऱ्या सवयी, मर्यादित शारीरिक हालचाली कारणीभूत


मुंबई:लठ्ठपणा हा भारतीय स्त्रियांमध्ये वेगाने एक अबोल महामारी बनत आहे आणि हे विशेषत: जीवनशैलीतील बदल, उच्च तणावाचे वातावरण आणि बसून काम करणाऱ्या दिनचर्या चिंताजनक प्रवृत्तींना कारणीभूत ठरणाऱ्या शहरी भागांमध्ये दिसून येत आहे. इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन ने समर्थन पुरविलेल्या इंडियन जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनोकॉलॉजी रिसर्च मध्ये नुकत्याच प्रकाशित केल्या गेलेल्या एका पेपरमध्ये दक्षिण आशियाई स्त्रियांमध्ये मुख्य लठ्ठपणाचे प्रमाण असंतुलितरित्या जास्त असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.


३५ ते ४९ वय असलेल्या सुमारे ५०% भारतीय स्त्रिया आता वजन जास्त असणे किंवा लठ्ठपणा यांच्यासोबत आयुष्य जगत आहेत. हे त्यांच्या प्रजनन काळात सार्वजनिक आरोग्याची वाढती चिंता ठळक करून दाखवत आहे. असेही लक्षात आणून दिले गेले आले आहे की, १८-३० वय असलेल्या स्त्रिया तेवढेच वय असलेल्या पुरुषांच्या तुलनेत जास्त दराने लठ्ठपणाशी संबंधित आरोग्याच्या जोखमींप्रती असुरक्षित असल्याचे दर्शवित आहेत आणि हे पिढ्यानपिढ्या पसरलेल्या संकटाचा मुद्दा मांडत आहे.


एन.एफ.एच.एस-५ च्या आकडेवारीनुसार, भारतातील ३३.५% शहरी स्त्रिया आणि १९.७ % ग्रामीण स्त्रिया लठ्ठ असून आयुष्य जगत आहेत आणि जीवनशैलीतील बदल, तणाव आणि बसून काम करणाऱ्या सवयी या वाढीस कारणीभूत आहेत. आहार घेण्याच्या सवयी खराब असणे, शारीरिक हालचाली कमी करणे आणि पी.सी.ओ.एस व गर्भावस्थेतील मधुमेहासारख्या चयापचय विकारांचे प्रमाण वाढणे, यांच्यातील दुव्यावर अहवालात भर देण्यात आला आहे आणि त्यात लठ्ठपणाने ग्रस्त २३.१% स्त्रियांना गरोदरपणात गर्भावस्थेतील मधुमेह होतो आणि त्यामुळे माता व बाळ दोघांनाही धोका निर्माण होतो, संततीला नवजात आय.सी.यू मध्ये दाखल करण्याची आणि दीर्घकालीन आरोग्याच्या समस्यांचा तोंड देण्याची शक्यता जास्त होते. ३० किलो / मीटर २ पेक्षा जास्त बी. एम. आय असलेल्या स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याचा धोका सुद्धा वाढत असल्याचे ब्लूम आय.व्ही.एफ लीलावती रुग्णालय आणि माजी अध्यक्षा एफ.ओ.जी.एस.आय वैद्यकीय संचालिका डॉ. नंदिता पालशेतकर यांनी सांगितले.


"लठ्ठपणाकडे एखाद्या स्त्रीच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या पद्धतीने लक्ष दिले गेले पाहिजे. गर्भारशी राहू इच्छिणाऱ्या लठ्ठ स्त्रियांनी जीवनशैलीत बदल करणे सर्वाधिक महत्त्वपूर्ण असते आणि त्यांनी गर्भारशी राहण्याआधी लठ्ठपणाविरोधी औषधे बंद करण्याची गरज असते. गरोदरपणात वजन वाढण्याकडे लक्ष ठेवले गेले पाहिजे आणि बी.एम.आय श्रेणींप्रमाणे त्याची व्यक्तीनुसार तयारी केली गेली पाहिजे असे मत कन्सल्टंट एंडोक्रिनोलॉजिस्ट आहेत आणि मधुमेह व चयापचय विकारांमध्ये तज्ञ डॉ. पिया बल्लानी ठक्कर यांनी मांडले.

Comments
Add Comment