Thursday, May 22, 2025

रायगड

ई-रिक्षाच्या प्रवासासाठी आता नियमावली

ई-रिक्षाच्या प्रवासासाठी आता नियमावली
माथेरान : ई-रिक्षाची सेवा उपलब्ध झाल्यापासून माथेरानला पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. सुरक्षित, स्वस्त आणि कमी वेळात जाण्याची सोय सर्वांना लाभल्याने या सेवेचा अधिक लाभ घेतला जात आहे.

केवळ वीस ई-रिक्षा कार्यरत असून दरदिवशी दोन ते तीन रिक्षांना दुरुस्तीसाठी अथवा चार्जिंगला लावले जाते त्यामुळे कमी रिक्षांमुळे पर्यटकांना तासंनतास ताटकळत उभे राहावे लागते. स्थानिक प्रवासी आणि वेळप्रसंगी त्यांचे पाहुणे असल्यास त्याचप्रमाणे नियमितपणे येणारा परिसरातील व्यावसायिक, व्यापारी वर्ग सुद्धा स्थानिकांच्या लाईनीत पटकन रिक्षातून निघून जातात त्यामुळे अनेकदा स्थानिक आणि पर्यटकांमध्ये वाद होतात. यावर तोडगा काढण्यासाठी संघटनेने येथील माथेरान बचाव संघर्ष समितीशी चर्चा करून यातून सुवर्णमध्य निघावा यासाठी चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये सर्वानुमते योग्य निर्णय घेण्यात आला असून एक नियमावली तयार करण्यात आली आहे.



त्याबाबतची अंमलबजावणी २४ मेपासून लागू करण्यात येणार आहे. जे स्थानिक लोक आहेत, ज्यांच्याकडे माथेरान रहिवासी पुरावा आहे अशांना स्थानिकांच्या लाईनीत टोकन दिले जाणार आहे. जे जे शासकीय अधिकारी आहेत ज्यांना ही सेवा मोफत उपलब्ध केली जाते त्यांनाही त्यांच्या कार्यालयापर्यंत न सोडता स्टेशन जवळील ई-रिक्षा स्टँडवर उतरावे लागणार आहे.

ह्या नियमावलीमुळे पर्यटकांना ताटकळत उभे राहावे लागणार नसून सर्वांना उत्तमरीत्या प्रवास करता येईल.
Comments
Add Comment